जीप उलटून आठ भाविक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 01:23 IST2018-07-06T01:23:00+5:302018-07-06T01:23:11+5:30

सिन्नर : जालना जिल्ह्यातून वडांगळी येथे सतीमाता - सामंतदादाच्या दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांची पिकअप जीप उलटून आठ जण जखमी झाले. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Eight people injured in Jeep | जीप उलटून आठ भाविक जखमी

जीप उलटून आठ भाविक जखमी

ठळक मुद्देतिघांची प्रकृती गंभीर

सिन्नर : जालना जिल्ह्यातून वडांगळी येथे सतीमाता - सामंतदादाच्या दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांची पिकअप जीप उलटून आठ जण जखमी झाले. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वावी - वडांगळी रस्त्यावर मिठसागरे गावाजवळ गुरुवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. जालना जिल्ह्यातील पांगरी - गोसावी या गावातील बंजारा समाजाचे भाविक वडांगळी येथील सतीमाता व सामतदादा येथे महिंद्रा पिकअप जीपने (एमएच २१ डीएच ०११८) जात असताना जीप उलटली.
या अपघातात सुभाष आडे (५०), सतीश आडे (१८) व वसराम आडे (७५) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत, तर सोन्याबाई आडे, हौशाबाई राठोड, रामनाथ राठोड, मीराबाई आडे, सुधाकर राठोड जखमी झाले आहेत.

Web Title: Eight people injured in Jeep

टॅग्स :Accidentअपघात