शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

कुंभार्डेत बॅन्जोच्या आवाजाने बैल बिथरल्याने आठ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 2:23 PM

उमराणे : दवेळा तालुक्यातील कुंभार्डे येथे लग्न मांडवाच्या बैलगाडीला जुंपलेले बैल बॅन्जोच्या आवाजाने व जमलेल्या गर्दीमुळे अचानक बिथरल्याने नवरीच्या भावासह आठ जण जखमी झाले असुन यातील दोन जणांच्या अंगावर बैलगाडी गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

उमराणे : दवेळा तालुक्यातील कुंभार्डे येथे लग्न मांडवाच्या बैलगाडीला जुंपलेले बैल बॅन्जोच्या आवाजाने व जमलेल्या गर्दीमुळे अचानक बिथरल्याने नवरीच्या भावासह आठ जण जखमी झाले असुन यातील दोन जणांच्या अंगावर बैलगाडी गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. कुंभार्डे येथील दादाजी विष्णू केदारे यांच्या मुलीचे लग्न असल्याने काल पारंपारिक पध्दतीने मांडव टाकण्याचा कार्यक्र म होता. सकाळी आठ ते नऊ वाजेच्या सुमारास गावातील मुख्य चौकातुन वाजतगाजत मांडव घराकडे घेऊन जाण्याच्या प्रथेनुसार बैलगाडी जुंपली होती. या कार्यक्र मासाठी आप्तेष्ठ नातेवाईकांसह भाऊबंद व गावातील नागरिक मोठ्या संख्येने चौकात उपस्थित होते. त्याचवेळी बॅन्जोचा आवाज व जमलेल्या गर्दीमुळे बैलगाडीला जुंपलेले बैल अचानक बिथरल्याने बैलगाडीसह आजुबाजुला सैरावैरा पळु लागल्याने जमलेल्या गर्दीतील म्हसु तुकाराम ठाकरे, सदाशिव भागा केदारे, हिरामण ठाकरे, नवरीचा भाऊ राहुल केदारे, देविदास ठाकरे, वैशाली देवरे, जयवंत निरभवणे,साहेबराव ठाकरे आदी जखमी झाले आहेत. त्यापैकी म्हसु ठाकरे व सदाशिव केदारे यांच्या अंगावरु न बैलगाडी गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच गावापासून जवळच असलेल्या उमराणे गावातुन उमराणे बाजार समितीची व वैद्यकीय विभागाची तसेच खाजगी रु ग्णवाहीका घटनास्थळी हजर होत जखमींना मालेगाव येथील खाजगी रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान घडलेल्या घटनेमुळे उशिरापर्यंत मांडव पडला नव्हता. शुभमंगल प्रसंगी अशी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. @

टॅग्स :Nashikनाशिक