शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आठ जखमी : लांडग्यांच्या टोळीने केली १४ शेळ्यांची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 14:59 IST

बिबट हा वन्यप्राणी समुहाने फिरत नाही आणि समुहाने शिकारही करत नाही. एक किंवा दोन शेळ्या या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या असत्या तर कदाचित बिबट हल्ला झाल्याची शक्यता होती; मात्र या हल्ल्यावरुन लांडगासदृश्य वन्यप्राण्याने समुहाने हल्ला केल्याचे प्रथमदर्शनी दिसते.

ठळक मुद्दे निफाडच्या थेटाळे शिवारात घटनाबिबट्याच्या हल्ल्याची अफवा

नाशिक :निफाड तालुक्यातील मौजे थेटाळे गावाच्या शिवारात एका वस्तीवर तारेच्या कुंपणामध्ये बंदीस्त असलेल्या शेळ्यांवर गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास लांडगासदृश्य वन्यप्राण्याच्या टोळीने हल्ला चढविला. लांडग्यांनी १४ शेळ्यांची शिकार करत आठ शेळ्यांना जखमी करून पळ काढल्याची घटना पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

थेटाळे येथील शाहु दगु शिंदे यांची गट क्रमांक ५७/२मध्ये शेती आहे. याठिकाणी त्यांच्या वस्तीवर राजाराम तुळशीराम शेवरे हे शेळी पालनाचा व्यवसाय करतात. शेवरे यांच्या मालकीच्या शेळ्या येथील भुखंडावर एका तारेच्या कुंपणामध्ये बंदिस्त करुन नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास लांडगासदृश्य वन्यप्राण्यांच्या टोळीने सामुहिकरित्या हल्ला चढवुन शेळ्यांची शिकार केली. यावेळी या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात १४ शेळ्यांना आपला जीव गमवावा लागला तर ८ शेळ्या जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल बशील शेख यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. शेवरे यांच्याकडून शेळ्यांची माहिती घेत वनरक्षकांनी मृतावस्थेतील शेळ्यांच्या जखमांची पाहणी करत पंचनामा केला. तसेच आजुबाजुला वन्यप्राण्यांच्या पाऊलखुणा तपासून त्यानुसार हल्लेखोर हिंस्त्र वन्यप्राण्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती पुर्व वनविभगाच्या सुत्रांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी पुर्व वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत पशुधनाच्या झालेल्या हानीची नुकसानभरपाई शासननियमानुसार पशुमालकाला दिली जाईल, अशी माहिती शेख यांनी दिली.बिबट्याच्या हल्ल्याची अफवाबिबट हा वन्यप्राणी समुहाने फिरत नाही आणि समुहाने शिकारही करत नाही. एक किंवा दोन शेळ्या या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या असत्या तर कदाचित बिबट हल्ला झाल्याची शक्यता होती; मात्र या हल्ल्यावरुन लांडगासदृश्य वन्यप्राण्याने समुहाने हल्ला केल्याचे प्रथमदर्शनी दिसते. लांडगा, कोल्हा यांसारखे वन्यप्राणी कळपाने राहून शिकार करतात, अशी माहिती पुर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.

टॅग्स :wildlifeवन्यजीवNashikनाशिकAccidentअपघातforest departmentवनविभागnifadनिफाड