दिंडोरीजवळील आयशर टेम्पोच्या अपघातात आठ जखमी
By Admin | Updated: December 22, 2014 00:38 IST2014-12-22T00:38:07+5:302014-12-22T00:38:18+5:30
दिंडोरीजवळील आयशर टेम्पोच्या अपघातात आठ जखमी

दिंडोरीजवळील आयशर टेम्पोच्या अपघातात आठ जखमी
नाशिक : दिंडोरीजवळ रविवारी सकाळी आयशर टेम्पोला झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे़ यातील जखमी हे टाकळी येथील रहिवासी असून, त्यामध्ये चार महिलांचाही समावेश आहे़ दरम्यान, यातील जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास आयशर टेम्पो प्रवाशांना घेऊन दिंडोरीकडे जात होता़ कादवा पेट्रोलपंपाजवळ हा टेम्पो पोहोचता त्यास अपघात झाला़ त्यामध्ये लता अरुण लोखंडे (२५, रा़ टाकळी, ता़ जि़ नाशिक), यांच्या डोक्यास गंभीर मार लागला आहे़ तर अलका पांडूरंग कालेकर (३५), किरण रमेश बेलेकर (२६), नंदा नाना शिंदे (४०), मीराबाई तायबा शिंदे (६०), मोसीन युसूफ शेख (३६), मुकेश मुनेंद्र (३२), शेरू मुक्तार मलिक (३०) रा़ टाकळी हे जखमी झाले़यातील जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)