रेल्वे प्रवासासाठी आठशे आॅनलाइन अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 23:14 IST2020-05-03T23:14:48+5:302020-05-03T23:14:48+5:30
नाशिक : जिल्ह्यातील निवारागृहात असलेल्या परप्रांतीयांना त्यांच्या गावी पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत सुमारे अकराशे परप्रांतीयांना रवाना करण्यात आले आहेत.

रेल्वे प्रवासासाठी आठशे आॅनलाइन अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील निवारागृहात असलेल्या परप्रांतीयांना त्यांच्या गावी पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत सुमारे अकराशे परप्रांतीयांना रवाना करण्यात आले आहेत.
जिल्ह्यांमध्ये अडकून पडलेल्यांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या असून, नाशिकरोडहून भोपाळ आणि लखनऊ येथे दोन गाड्या रवाना करण्यात आलेल्या आहेत. रविवारी (दि.३) कोणतीही गाडी रवाना झाली नसली तरी गावी परतण्यासाठी सुमारे ८०० जणांनी तिकिटासाठी आॅनलाइन अर्ज केलेले आहेत. परतण्यासाठी लागणारे पास हे पोलिसांमार्फत दिले जातात तर प्रक्रिया आॅनलाइन केली जाते.
परराज्यात परतण्यासाठी अर्ज केलेल्यांची संख्या ८१७ इतकी असून, यामध्ये मजूर, विद्यार्थी आणि कामगारांची संख्या मोठी आहे. गावी परतण्यासाठी विशेष पासची व्यवस्था करण्यात आली असली तरी त्यासाठी आॅनलाइन अर्ज सादर करावा लागतो. त्यानुसार एकाच दिवशी ८००च्या पुढे अर्ज दाखल झाले आहेत. सदर अर्ज जिल्हा नोडल अधिकाऱ्यांकडे पाठविले जाणार असून, त्यांची मंजुरी मिळाली की त्यांना हलविण्यासाठीच आदेश काढले जातील.राज्यातच अन्य जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी आॅनलाइन अर्ज केलेल्यांची संख्यादेखील मोठी असून, ४९७ जणांनी अर्ज सादर केले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून गावी परतणाºया परप्रांतीयांमध्ये आॅनलाइन अर्जाविषयी संभ्रम होता. आता अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली असून, निवारा केंद्रातील अर्ज केलेल्यांना येत्या दोन दिवसांत विशेष गाडीने रवाना केले जाणार आहे.