शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलावर आयशरची कंटेनरला धडक; मायलेकींचा जागीच मृत्यू

By नामदेव भोर | Updated: May 23, 2023 15:21 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नमवार पूल परीसरातील मुंबई आग्रा महामार्ग उड्डानपुलावर झालेल्या अपघातात एक सात वर्षाच्या मुलीसह तिच्या आईचा मृत्यू झाला आहे.

नाशिक : शहरातून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डान पुलावर मंगळवारी (दि.२३) सकाळी द्वारका ते आडगाव दरम्यानच्या कन्नमवार पुलावर आयशर ट्रक व कंटेनरमध्ये या वाहनांमध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातात मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर कंटेनरचा आणि आयशर ट्रकचे चालक या अपघातात जखमी झाला असून एका आठ वर्षाच्या मुलीचाही जखमींमध्ये समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नमवार पूल परीसरातील मुंबई आग्रा महामार्ग उड्डानपुलावर झालेल्या अपघातात एक सात वर्षाच्या मुलीसह तिच्या आईचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सात वर्षाची तरनुम अफजल शेख व तिची आई नफिसा अफजल शेख (२९) यांचा सामावेश असून कंटेनर चालक मोहम्मद ताहिर कुदरतअली शेख व आयशर चालक अफजल शेख यांच्यासह एक ८वर्षाची मुलगी आयशा शेख जखमी झाली आहे. या अपघातातील रुग्णांना औषधोपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पंचवटी पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, नाशिक शहरात अपघाताच्या घटना नित्याच्या झाल्या असून रोजच कुठे ना कुठे अपघात घडत आहे. अशातच नाशिक मुंबई महामार्गावर आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली असून यात मायलेकींचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकPoliceपोलिस