आयशरला कंटेनरची धडक; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 23:09 IST2022-04-11T23:09:03+5:302022-04-11T23:09:32+5:30
इगतपुरी : येथील तळेगाव फाट्याजवळ महामार्गावर उभ्या असलेल्या आयशरला कंटेनरची जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे.

आयशरला कंटेनरची धडक; एक ठार
इगतपुरी : येथील तळेगाव फाट्याजवळ महामार्गावर उभ्या असलेल्या आयशरला कंटेनरची जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई - नाशिक महामार्गावर तळेगाव फाट्यावर सोमवारी (दि.११) सकाळी ६ वाजेच्या सुमारास कंटेनर (क्र. एमएच ४३ इ ५९३०) नाशिकच्या दिशेने जात असताना उभ्या असलेल्या आयशर (क्र. एमएच १५ एचएच ८२२२) याला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात आयशरचालक अशोक निवृत्ती सांगळे (४५, रा. चाचडगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला तर कंटेनर चालक अरविंद यादव (रा. जोनपूर, उत्तर प्रदेश) हा जखमी झाला आहे. जखमींना जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी दाखल होत पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस करत आहेत.