मालेगावात कोरोनामुक्तीचे प्रयत्न ठरताय यशस्वी मॉडेल : बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 04:44 PM2020-06-07T16:44:53+5:302020-06-07T16:49:19+5:30

मालेगावातील वाढलेली रूग्णसंख्या ही राज्याच्या चिंतेची बाब वाटत होती, परंतु प्रशासकीय पातळीवरील आपसात्मक जबाबदारी वाटपाच्या सुत्रामुळे मालेगावचे चित्र सकारात्मकदृष्ट्या बदलले असून मालेगावच्या कोरोनामुक्तीसाठी प्रशासनाने केलेले प्रयत्न राज्यातील एक यशस्वी मॉडेल म्हणून समोर येताना दिसत असल्याचे असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. 

Efforts of Malegaon administration can be a model - Balasaheb Thorat | मालेगावात कोरोनामुक्तीचे प्रयत्न ठरताय यशस्वी मॉडेल : बाळासाहेब थोरात

मालेगावात कोरोनामुक्तीचे प्रयत्न ठरताय यशस्वी मॉडेल : बाळासाहेब थोरात

Next
ठळक मुद्दे मालेगावच्या कोरोनामुक्ती प्रयत्नांची प्रशंसा मालेगावातील प्रशासनाचे प्रयत्न मॉडेल ठरू शकतील -बाळासाहेब थोरात

नाशिक : संपूर्ण जगभरातील विविध देशांसह भारत, महाराष्ट्र आणि नाशिक जिल्हा अडीच महिन्यांपासून कोरोना संकटाचा सामना करीत आहे.  राज्यातील  सर्वच ठिकाणी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू आहे.  काही संवेदनशील ठिकाणी विशेष काळजी घेतली जात असून त नाशिक जिल्ह्यातील मालेगांवचाही समावेश होता. सुरूवातीला मालेगावातील वाढलेली रूग्णसंख्या ही राज्याच्या चिंतेची बाब वाटत होती, परंतु प्रशासकीय पातळीवरील आपसात्मक जबाबदारी वाटपाच्या सुत्रामुळे मालेगावचे चित्र सकारात्मकदृष्ट्या बदलले असून मालेगावच्या कोरोनामुक्तीसाठी प्रशासनाने केलेले प्रयत्न राज्यातील एक यशस्वी मॉडेल म्हणून समोर येताना दिसत असल्याचे असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी (दि.7)नाशिकमध्ये  केले. 
जिल्ह्यातील कोरोना नियंत्रण व निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृहात प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मीकांत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे आदी उपस्थित होते. बाळासाहेब थोरात म्हणाले, नाशिक शहर व जिल्ह्यात परजिल्ह्यातून आलेल्या लोकांमुळे कोरोना रूग्णांची संख्या वाढलेली दिसून येते. परंतु प्रशासनाच्या सतर्कतेमुळे त्यावर तात्काळ उपाययोजना केल्या जात आहेत. बाहेरून आलेल्या नागरीकांना थेट घरी न पाठवता त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे, अशा प्रकारे प्रशासकीय पातळीवरील प्रयत्नांनुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. त्याचे दृश्य परिणाम मालेगांवात दिसून येत आहेत. मालेगावात  रूग्ण संख्या व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाणही कमी होताना दिसत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान,  संकट अजूनही संपलेले नाही; काळजीचा मोठा कालखंड समोर असून सर्वांनी सतर्क राहिल्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे अधोरेखित करताना सतर्कता कायम ठेवण्याची सुचना त्यांनी केली. तसेच अशा परिस्थितीत जनतेतल्या प्रत्येकाने आपण काय करायला हवे, याची जाणीव ठेवायला हवी. गेल्या अडीच महिन्यात लोकांना बरीच समज आलेली दिसून येते, लोकांनीही आता स्वत:साठी, कुटुंबासाठी, समाजासाठी काळजीने वागण्याचे आवाहन करतानाच प्रशासनाला लोकजागृती व स्वयंशिस्त कायम राखण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले, 

Web Title: Efforts of Malegaon administration can be a model - Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.