जळगाव नेऊर पंचक्र ोशीतील महिलांना पैठणी प्रशिक्षण केंद्रासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 07:13 PM2020-10-07T19:13:02+5:302020-10-07T19:14:23+5:30

जळगाव नेऊर : जळगाव नेऊर आणि पंचक्र ोशीतील महिलांना पैठणी प्रशिक्षण यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी व्यक्त केले.

Efforts are being made for Paithani Training Center for women in Jalgaon Neur Panchakra | जळगाव नेऊर पंचक्र ोशीतील महिलांना पैठणी प्रशिक्षण केंद्रासाठी प्रयत्नशील

जळगाव नेऊर येथील संस्कृती हॉन्डलुम हबला भेट दिल्यानंतर तेथील प्रशिक्षणार्थींशी संवाद साधताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड.

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी हबला दिली भेट

जळगाव नेऊर : जळगाव नेऊर आणि पंचक्र ोशीतील महिलांना पैठणी प्रशिक्षण यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी व्यक्त केले.
जळगाव नेऊर (ता. येवला) येथे असलेल्या संस्कृती पैठणी हबला त्यांनी भेट दिली. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर, येवला पंचायत समितीचे
गटविकास अधिकारी उमेश देशमुख, सहाय्यक गटविकास अधिकारी अन्सार शेख, ग्रामसेवक बाळासाहेब बोराडे, संस्कृती हॅन्डलूम व संस्कृती पैठणीचे संचालक गोविंद तांबे, सोमनाथ तांबे, बचतगटाच्या पूजा त्रिभुवन, दीपाली सोनवणे, योगिता वाघ, गणेश तांबे, सागर कुराडे, सचिन ठोंबरे, रावसाहेब ठोंबरे, नितीन चव्हाणके, नितीन वाघ, तुषार गायके, सचिन वाघ, राहुल तांबे, विकास वाघ, संतोष वाघ, भाऊसाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
या वेळी बनसोड यांनी हातमागावर पैठणी कशी तयार होते, याची सविस्तर माहिती जाणून घेत उपस्थित बचतगटातील महिलांना पैठणी प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. जळगाव नेऊर पंचक्र ोशीतील तरु णांनी स्वत: पैठणी विणकामाचे यशस्वी प्रशिक्षण अवगत करून आकर्षक पैठणी निर्मितीचे तंत्र अवगत करून जळगाव नेऊरचे नाव सातासमुद्रापार पोहोचवा. जळगाव नेऊर पंचक्र ोशीतील बचतगटांतील महिलांसाठी पैठणी विणकाम प्रशिक्षण केंद्रासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बचतगटाच्या महिलांना पैठणी विणकाम प्रशिक्षणामुळे हक्काचा रोजगार उपलब्ध होणार असल्याने पैठणी प्रशिक्षणासाठी येणाº्या सर्व महिलांना संस्कृती हॅन्डलूम व संस्कृती पैठणीतर्फे हवे ते सहकार्य व मार्गदर्शन केले जाईल.
- गोविंद तांबे, संचालक, संस्कृती पैठणी हॅन्डलूम.
 

Web Title: Efforts are being made for Paithani Training Center for women in Jalgaon Neur Panchakra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.