शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
3
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
4
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
5
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
6
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
7
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
8
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
9
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
10
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
11
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
12
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
13
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
14
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
15
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
16
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
17
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
18
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

मनोरंजनातुन शैक्षणिक विकास ​​​​​​​खेड्यातही रेडीओ वाजु लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 8:44 PM

वैतरणानगर : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक क्षेत्र पुर्णपणे ठप्प झाले असुन आँनलाईन शिक्षण प्रणालीवर भर दिला जात आहे. मात्र आदिवासी ग्रामीण भागामध्ये नेटवर्क व परिस्थिती नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते मात्र पंकज जाधव मित्रमंडळ व वैतरणा केंद्रातील शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रातील ४५१ विद्यार्थ्यांना एफ एम दिल्याने या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये प्रोत्साहन मिळाले असुन महाराष्ट्र राज्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात असा उपक्रम नाशिक जिल्हा परिषदे अंतर्गत राबवला गेला आसल्याचे प्रतिपादन जि प अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देराज्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात असा उपक्रम

वैतरणानगर : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक क्षेत्र पुर्णपणे ठप्प झाले असुन आँनलाईन शिक्षण प्रणालीवर भर दिला जात आहे. मात्र आदिवासी ग्रामीण भागामध्ये नेटवर्क व परिस्थिती नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते मात्र पंकज जाधव मित्रमंडळ व वैतरणा केंद्रातील शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रातील ४५१ विद्यार्थ्यांना एफ एम दिल्याने या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये प्रोत्साहन मिळाले असुन महाराष्ट्र राज्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात असा उपक्रम नाशिक जिल्हा परिषदे अंतर्गत राबवला गेला आसल्याचे प्रतिपादन जि प अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले.पंकज जाधव मित्रमंडळ व वैतरणा केंद्रातील शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रातील ४५१ विद्यार्थ्यांना एफ एम वाटप करण्यात आले. यावेळी श्री क्षीरसागर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड, शिक्षण सभापती सौ. सुरेखाताई दराडे, महिला व बालकल्याण सभापती सौ. सुशिला मेंगाळ, माजी जि प अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, माजी जि प सदस्य गोरख बोडके, सभापती सौ. जयाताई कचरे, उपसभापती सौ. विमल गाढवे, गटविकास अधिकारी श्रीमती लता गायकवाड, शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी सौ. वैशाली वीर, चेअरमन नितीन खातळे, पं स सदस्य सौ. कौसाबाई करवंदे, सौ. कल्पना हिंदोळे, सरपंच सौ. आशा गिर्हे, उपसरपंच सौ. सीमा खातळे, माजी सभापती गणपत वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंधे, प्रा जालिंदर सावंत, गटशिक्षणाधिकारी श्रीमती माधुरी, बालविकास प्रकल्पअधिकारी, पंडीत वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी ए बी देशमुख, कांबळे, विस्तार अधिकारी शिवाजी अहिरे, अशोक मुंढे आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सोशल डिसटंसींगचा नियमाचे पालन करण्यात आल्याने सर्वत्र या कार्यक्रमाचे कौतुक होत आहे.कार्याक्रमाचे प्रास्तविक केंद्रप्रमुख राजेंद्र नांदुरकर यांनी केले तर सुत्रसंचालन रविंद्र चव्हाण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैतरणा केंद्रातील मुख्याध्यापक शिक्षकांनी परिश्रम घेतले.कोरोना काळात आदिवासी दुर्गम भागात शैक्षणिक काम करतांना मोठ्या प्रमाणात अडचणीना सामोरे जावे लागत. ग्रामीण भागामध्ये इंटरनेट सुविधा व आर्थिक परिस्थिती मुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत होत्या. वैतरणा केंद्रात एकुण १४ शाळा असुन या प्रत्येक विद्यार्थ्यांना एफ एम डिवाईस उपलब्ध करून दिल्यास शिक्षण सुलभ होऊ शकते हि संकल्पना मि माझे जावई पंकज जाधव यांच्याकडे मांडली त्यांनी मला त्यांचे मित्र व जाधव यांनी जवळ पास एक लाख पंचवीस हजार व केंद्रातील शिक्षक यांनी चाळीस हजाराची मदत केल्याने वैतरणा केंद्रातीव ४५१ विद्यार्थ्यांना आज जिल्हापरिषदेच्या व पंचायत समितीच्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते एफ एम डिवाईस वाटप वैतरणा येथे वाटप करण्यात आले. राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात प्रथमच एफ एम वाटप होत असल्याने आनंद होत आहे.- राजेंद्र नांदुरकर, केंद्र प्रमुख वैतरणा. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी