आधुनिक तंत्रज्ञानानुसार शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल व्हावा : अजित पवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 01:26 AM2021-07-02T01:26:46+5:302021-07-02T01:27:21+5:30

शिक्षण संस्थांनी आधुनिक काळातील उद्योगांची गरज आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Educational curriculum should be changed according to modern technology: Ajit Pawar | आधुनिक तंत्रज्ञानानुसार शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल व्हावा : अजित पवार 

आधुनिक तंत्रज्ञानानुसार शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल व्हावा : अजित पवार 

Next
ठळक मुद्देराजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकच्या नूतन इमारतीचे उदघाटन

नाशिक : शिक्षण संस्थांनी आधुनिक काळातील उद्योगांची गरज आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत तसेच मविप्रच्या राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेज नवीन इमारत उद्घाटन आणि उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय लोकार्पण करण्यासोबतच कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, नाशिकचे गुरुवारी (दि. १) शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर असे नामकरण करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. कर्मवीरांना मविप्र संस्थेने रचलेला पाया अधिक भक्कमपणे पुढे नेण्यासाठी संस्थेमार्फत आधुनिक शिक्षण पध्दतीची कास धरावी, असा सल्ला देतानाच नवीन इमारती पर्यावरणपूरक तयार होण्याची गरज व्यक्त केली. तसेच संस्थेला ५ कोटीची मदत देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. मनुवाद आजही संपलेला नाही. वेगवेगळ्या मार्गाने तो आजही काम करत आहे. अशा परिस्थितीत बहुजनांच्या शिक्षणासाठी सावधगिरीने पाऊल टाकण्याची गरज असल्याचे मत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. दरम्यान, शरद पवार यांचे संस्थेसाठी मोठे योगदान असून, त्यांचे नाव आर्किटेक्चर महाविद्यालयास दिल्याने महाविद्यालयाचा नावलौकिक आणखी वाढल्याचे मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी प्रास्ताविकात नमूद केले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, नितीन पवार, दिलीप बनकर, सीमा हिरे, मविप्रचे सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो आहिरे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले आदी उपस्थित होते. मविप्रच्या सरचिटणीस निलीम पवार यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी आभार मानले आहे.

Web Title: Educational curriculum should be changed according to modern technology: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.