औंदाणेत शिक्षण परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 14:54 IST2019-02-23T14:54:38+5:302019-02-23T14:54:48+5:30
औंदाणे : देवळाणे (ता.बागलाण) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण परिषद संपन्न झाली. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख डी.जे. काकळीज होते.

औंदाणेत शिक्षण परिषद
औंदाणे : येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण परिषद संपन्न झाली. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख डी.जे. काकळीज होते. प्रमुख पाहुणे म्हणुन उपसरपंच प्रकाश देवरे, वाल्मीक चव्हाण, मन्साराम फटांगडे , संजय भोइर किशोर घोडे , भरत देवरे ,सुभाष शिरसाट, पुडंलीक ढेपले,विठ्ठल देवरे ,मंगला सोनवणे ,प्रविण पवार उपस्थित होते. शाळेच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शिक्षण परीषदेत अजमीर सौंदाणे व लखमापूर केंद्रांतील सर्व जिल्हा पारिषद शाळेतील मुख्याधापक, शिक्षक,शिक्षिका यांना परिषदेत गणित विषय तज्ञ वाल्मीक चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख डी.जे काकळीज यांनी शैक्षणिक आढावा घेतला. यावेळी मुख्याध्यापिका बेबी देवरे, नंदकुमार पवार, राजेंद्र पाटील, मरलीधर पवार, संजय पवार, व्ही.टी.पवार, संजय शेवाळे, प्रतिभा अहिरे, रेखा सपके, हेमंत महाले उपस्थित होते. सुत्रसंचालन हेमंत महाले यांनी तर आभार व्ही.टी.पवार यांनीा मानले.