शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

पर्यावरणपूरक गणेश विर्सजन : तीस नैसर्गिक जलाशय, तर ४६ कृत्रिम तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:04 IST

शहरात पर्यावरणपूरक गणेश विर्सजन व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने यंदाही प्रतिवर्षांप्रमाणे गोदावरी, नासर्डी आणि वालदेवी नदीच्या परिसरात एकूण ३० ठिकाणी अधिकृत विसर्जन स्थळे घोषित करण्यात आली

नाशिक : शहरात पर्यावरणपूरक गणेश विर्सजन व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने यंदाही प्रतिवर्षांप्रमाणे गोदावरी, नासर्डी आणि वालदेवी नदीच्या परिसरात एकूण ३० ठिकाणी अधिकृत विसर्जन स्थळे घोषित करण्यात आली असून, ३६ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. शिवाय घरगुती विसर्जन करणाऱ्यांसाठी विशेषत: प्लॅस्टर आॅफ पॅरीसच्या मूर्तींसाठी मोफत अमोनियम बायकार्बोनेट उपलब्ध करून देण्यात आले आहे.  महापालिकेच्या अधिकºयांनी यासंदर्भात विविध ठिकाणी भेटी देऊन तयारीचा आढवा घेतला. महापालिकेच्या वतीने मुख्य जलाशय आणि कृत्रिम कुंड येथेही सेवाभावी संस्थांच्या वतीने मूर्ती संकलनाची व्यवस्था केली आहे.  अधिकृत घोषित करण्यात आलेल्या विसर्जनाच्या ठिकाणी सुरक्षितेसाठी सुरक्षा कर्मचारी आणि जीवरक्षक तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकृत ठिकाणीच विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.विसर्जनासाठी अधिकृत जलाशयपंचवटी - राजमाता मंगल कार्यालय, सीता सरोवर म्हसरूळ, नांदूर, मानूर गोदाघाट, आडगाव पाझर तलाव, तपोवन, रामकुंड, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर सांडवा, रामवाडी जॉगिंग ट्रॅक.नाशिक पूर्व - लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठ परिसर, नंदिनी गोदावरी संगम.सातपूर - आनंदवल्ली गाव घाट, सोमेश्वर मंदिर घाट, गंगापूर धबधबा, अंबड लिंकरोडवरील नंदिनीनदी पूल, मते नर्सरी पुल, आयटीआय पूल औदुंबरनगर.नाशिकरोड - चेहडी गाव दारणा नदीपात्र, पंचक गोदावरी घाट, दसक घाट, वालदेवी नदी देवळालीगाव, वडनेर पंपींग नदी किनारी, विहिीागाव वालदेवी नदी किनारी.नाशिक पश्चिम - य. मु. पटांगण, रोकडोबा पटांगण, कपूरथळा पटांगण, सिद्धेश्वर मंदिर घारपुरे घाट, हनुमानघाट, अशोकस्तंभ.कृत्रिम तलावांची विभागनिहाय व्यवस्थापंचवटी - राजमाता मंगल कार्यालय, गोरक्षनगर कृत्रिम, आरटीओ, सीतासरोवर म्हसरूळ, नांदूरमानूर, कोणार्कनगर, तपोवन, गौरी पटांगण, नरोत्तम भवन पंचवटी कारंजा, रामवाडी जॉगिंग ट्रॅक.नाशिक पूर्व - लक्ष्मी नारायण घाट, रामदास स्वामी मठ परिसर, नंदिनी गोदावरी संगम परिसर, साईनाथनगर चौक, रामदास स्वामीनगर टाकळीरोड, शिवाजीवाडीपूल नंदिनीनदीजवळ, किशोरनगर शारदा शाळेजवळ, राणेनगर, कलानगर चौक, राजसारथी सोसायटी.सातपूर - आनंदवली गाव घाट परिसर, सोमेश्वर मंदिर परिसर, गंगापूर धबधबापरिसर, अंबडलिंकरोडवरील नंदिनी पूल परिसर, मते नर्सरीपूल परिसर, आयटीआय पूल औदुंबरनगर, शिवाजीनगर धर्माजी कॉलनी, रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ पाइपलाइनजवळ, अशोकनगर पोलीस चौकी.नाशिकरोड - मुक्तिधाममागे मनपा शाळा क्र मांक १२५ मैदान, शिखरेवाडी मैदान, मनपा नर्सरी जयभवानी रोड, मनपा मैदान चेहडी पंपिंग श्रमिकनगर ट्रक टर्मिनस, नारायण बापू चौक जेलरोड.नाशिक पश्चिम - चोपडा लॉन्स पूल परिसर, चव्हाण कॉलनी परीची बाग पंपिंग स्टेशन परिसर, फॉरेस्ट नर्सरी पूल, बॅडमिंटन हॉल येवलेकर मळा, दोंदे ब्रिज नंदिनी नदी पूल, महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ, लायन्स क्लब ग्राउंड जुनी पंडित कॉलनी, शितला देवी मंदिर, टाळकुटेश्वर मंदिराजवळ.सिडको - राजे संभाजी स्टेडिअम, अश्विननगर, डे केअर सेंटर, इंदिरानगर, जिजाऊ वाचनालय, गोविंदनगर, पवननगर, पाण्याची टाकी, कामटवाडा शाळा, वालदेवी नदीघाट कृत्रिम, पिंपळगाव खांब.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपती