देवपूर विद्यालयाच्या ५०० विद्यार्थ्यांनी बनविल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 17:05 IST2018-09-12T17:03:57+5:302018-09-12T17:05:09+5:30
सिन्नर तालुक्यातील देवपूर विद्यालयात शिवसरस्वती फाऊंडेशनच्यावतीने शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन पर्यावरणपूरक गणपती बनविले.

देवपूर विद्यालयाच्या ५०० विद्यार्थ्यांनी बनविल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन केले तरच आपल्याला आरोग्यमय व व्यवस्थित जगता येईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी केले. व्यासपीठावर पंचायत समितीचे भाजप गटनेते विजय गडाख, दत्तात्रय आदिक, सुनील पगार, वैशाली पाटील, सुवर्णा मोगल, प्रमोद बधान, ताराबाई व्यवहारे, शंकर गुरुळे, नानासाहेब खुळे, राजेश आहेर, रामेश्वर मोगल आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आतापासूनच पर्यावरणाचे रक्षण करायला शिकले पाहिजे. शाडू मातीपासून गणपती बनवून तो शक्यतो घरीच बुडवा असे आवाहन कोकाटे यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कला शिक्षक राजेश आहेर यांचा कोकाटे यांनी सत्कार केला. उत्कृष्ट गणपती बनविणाºया विद्यार्थ्याचे मान्यवरांनी कौतूक केले.