महात्मा फुले कला दालनात इको फ्रेंडली गणरायाची सजली रूपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:16 IST2021-09-03T04:16:20+5:302021-09-03T04:16:20+5:30
कोरोनाचा संकट काळ अद्याप संपलेला नाही, तसेच पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी महापालिकेने गेल्यावर्षी प्रमाणेच मिशन विघ्नहर्ता मोहीम राबवण्यास सुरुवात केली ...

महात्मा फुले कला दालनात इको फ्रेंडली गणरायाची सजली रूपे
कोरोनाचा संकट काळ अद्याप संपलेला नाही, तसेच पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी महापालिकेने गेल्यावर्षी प्रमाणेच मिशन विघ्नहर्ता मोहीम राबवण्यास सुरुवात केली असून, त्या अंतर्गत महानगरपालिका व नाशिक जिल्हा शाडू मातीचे मूर्तिकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कलादालनात १० सप्टेंबरपर्यंत पर्यावरणपूर्वक शाडू मातीच्या गणेश मूर्तीं तसेच पर्यावरणपूरक सजावट आरास साहित्याच्या प्रदर्शनाचे उद्घाटन तसेच वेबसाईटचे अनावरण पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या हस्ते व मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.३) पार पडले.
पर्यावरण स्नेही गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या मूर्तींना प्राेत्साहन देणे, विसर्जनाच्या दिवशी फिरते तलाव या संकल्पना नाविन्यपूर्ण असून, त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याचे पांडेय यांनी सांगितले.
मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी यावेळी मिशन विघ्नहर्ता अंतर्गत ऑनलाइन बुकिंग द्वारे टाईम स्लॉट उपलब्ध करून देऊन विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच मोठ्या इमारती कॉलनी या परिसरात ‘टँक ऑन व्हील’ या नवीन संकल्पनेच्या माध्यमातून नागरिकांना श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी मदत होणार आहे, असे सांगितले. घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड यांनी प्रास्ताविक केले. आभार नाशिक जिल्हा शाडू मूर्ती संघटनेचे अध्यक्ष संतोष शहरकर यांनी मानले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर,उपायुक्त मनोज घोडे पाटील, प्रदीप चौधरी, शहर अभियंता नितीन वंजारी आदी उपस्थित होते. यावेळी या उपक्रमात सहकार्य करणारे व मोलाचे योगदान असणाऱ्या गौरव बोरसे, शौर्या शेटे, संयुक्ता कांबळे, ओमकार कासार आदी विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार या वेळी करण्यात आला.
छायाचित्र ०२ एनएमसी गणेश...