शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
3
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
4
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
5
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
6
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
7
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
8
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
9
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
10
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
11
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
12
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
13
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
14
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
15
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
16
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
17
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
18
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
19
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
20
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?

रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:11 IST

दिंडोरी/लखमापूर : तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांच्या ग्रहणातून कधी सुटका होणार या चिंतेत परिसरातील शेतकरी, प्रवासी व वाहनधारक सापडले आहेत.

ठळक मुद्देअपघाताना निमंत्रण : दिंडोरी तालुक्यातील वाहनधारकांची डोकेदुखी

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी/लखमापूर : तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांच्या ग्रहणातून कधी सुटका होणार या चिंतेत परिसरातील शेतकरी, प्रवासी व वाहनधारक सापडले आहेत.दिंडोरी तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांच्या दुरवस्थेत वाढ झाली आहे. अपघातांचे प्रमाणही वाढल्याने डोकेदुखी वाढली आहे. लखमापूर ते म्हेळुस्के हा रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे. या रस्त्यावर कादवा नदीवरील पूल येत असल्यामुळे त्या पुलांवरून पावसाळ्यात प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखे आहे. लखमापूर फाटा ते करजंवण फाटा हा रस्ता औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. परंतु या रस्त्याच्या साइडपट्ट्याचे काम अर्धवट आहे.या रस्त्यावर सध्या खड्ड्याचा विस्तार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. म्हेळुस्के फाटा ते कादवा म्हाळुंगी, म्हाळुंगी ते पाडे या रस्त्यांची स्थिती सध्या खडतर बनली आहे. दहेगाव फाटा ते वागळूद, वागळूद ते फोफशीगाव, दहिवी ते माळे तसेच आक्र ाळे ते एचएएल गेट जानोरीपर्यंत, दिंडोरी ते कोराटे, मोहाडी ते अंबे (जानोरी) खेडगाव ते शिंदवड, बोपेगाव ते खेडगाव फाटा, बोपेगाव (कावळेवाडी फाटा) ते सोनजांब, मावडी ते मावडी फाटा, वलखेड फाटा ते ननाशी हा रस्ता मागील कित्येक वर्षांपासून खड्ड्यांचे दु:ख भोगत आहे.पहिल्याच पावसात खड्ड्यातगतवर्षी वरखेडा ते कादवा कारखाना, दिंडोरी पालखेड, पिंपळगाव आदी रस्त्यांचे कोट्यवधी खर्च करून नूतनीकरण झाले. मात्र यातील काही भागाचे डांबरीकरण वरील शेवटचे सिलकोट करणे पावसाळ्यापूर्वी करणे बाकी राहिले अन् पाऊस सुरू होताच रस्ता खराब होत खड्ड्यात रूपांतरित झाला.वलखेड ते पाडे हा रस्ताही खराब झाला. बांधकाम विभागाने रस्ते संबंधित ठेकेदारांकडून दुरु स्त केले जातील, असे वारंवार सांगितले मात्र दुरु स्तीस अद्यापही मुहूर्त लागलेला नाही.ठेकेदारांची मनमानी, शेतमालाची नासाडीतालुक्यात एका ठेकेदार कंपनीने विविध कामे घेतली आहेत; मात्र ती वेळेत पूर्ण केली नसून गुणवत्ता राखलेली नसल्याचा आरोप वाहन-धारकांनी केला आहे. वरखेडा-खेडगाव-शिंदवड रस्त्याचे काम घेतलेला ठेकेदार कामही करत नाही अन् काम सोडतही नाही. त्यास लाखोंचा दंड केल्याचे बांधकाम विभाग सांगत लवकरच काम सुरू होईल, असे आश्वासन देत आहे. मात्र अद्याप काम पूर्ण झालेले नाही. तसेच खराब रस्त्यामुळे शेतकरीवर्गाला पिकविलेला शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी विलंब होतो. परिणामी कवडीमोल भावाने माल विकावा लागतो.रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होऊन अनेकजण जखमी तर काही ना प्राणाला मुकावे लागले. अनेकांना पाठीचे आजार उद्भवले आहेत, तर खड्ड्यांमधून मार्गक्रमण करताना वाहनांचे पाटर््सही तुटल्याने नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. सध्या तालुक्यातील काही महत्त्वपूर्ण रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, ते एक प्रकारे तालुक्याच्या ग्रीन झोनला अथवा औद्योगिक क्षेत्राला या रस्त्यामुळे ग्रहण लागले आहे. त्यामुळे विकासाला खीळ बसण्याचा धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRainपाऊस