लोणजाई डोंगरावरील आगीत पंधराशे झाडे खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 12:27 AM2020-03-03T00:27:12+5:302020-03-03T00:28:34+5:30

लासलगाव : विंचूर गावाजवळ भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या निसर्गरम्य लोणजाई डोंगरावर अज्ञात युवकांकडून आग लावण्यात आली. या आगीत दोन एकरावरील पंधराशे झाडे खाक झाली.

Eat fifteen hundred trees in the fire of Lonjai Mountain | लोणजाई डोंगरावरील आगीत पंधराशे झाडे खाक

लोणजाई डोंगरावरील आगीत पंधराशे झाडे खाक

Next
ठळक मुद्दे पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे यांनी चौकशीची मागणी केली


लासलगाव : विंचूर गावाजवळ भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या निसर्गरम्य लोणजाई डोंगरावर अज्ञात युवकांकडून आग लावण्यात आली. या आगीत दोन एकरावरील पंधराशे झाडे खाक झाली.
लोणजाई डोंगरावर निफाड येथील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने लावण्यात आलेल्या झाडांना अज्ञात तरु णांनी रविवारी (दि.१) दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लावली. या आगीत दोन एकरावरील जांभळीचे पंधराशे झाडे जळून खाक झाले. याबाबत पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे यांनी चौकशीची मागणी केली आहे.
निफाड तालुक्यातील आध्यात्मिक पीठ म्हणून श्रीक्षेत्र लोणजाई देवस्थान विकसित होत आहे. या देवस्थानच्या सभोवताली लोणजाई पर्वतावर तीन वर्षांपासून विविध सामाजिक संस्थांच्या वतीने तसेच सुभाषनगर ग्रामपंचायत, निफाड पंचायत समिती, स्वामी समर्थ भक्तपरिवार यांच्यासह वतीने जवळपास सात हजाराहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली आहे. यात जांभूळ, सीताफळ, चिंच, वड, पिंपळ यासह उपयोगी झाडांचा समावेश आहे. ही झाडे बहरत असताना अज्ञात युवकांनी या झाडांना आग लावून पळ काढला. यात दोन एकरवरील क्षेत्रातील जांभळाचे पंधराशे झाडे खाक झाले. डोंगराला आग लागल्याचे दिसताच विंचूर येथील सरपंच मधुकर दरेकर व परिसरात काम करणारे मजूर यांनी घटनास्थळी धाव घेत सदरची आग विझविण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात लासलगाव पोलिसांत चौकशी करण्याचा अर्ज दिला आहे.
दरम्यान देवस्थान परिसरात येणारे भाविक विविध सामाजिक संस्था यांनी लावलेल्या झाडांना आग लावण्याचा प्रकार झाला आहे याची चौकशी व्हावी, अशी मागणी लोणजाई परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.गेली तीन वर्षांपासून लोणजाई देवस्थान परिसरात सामाजिक संस्थांना घेऊन वृक्षारोपणाचे काम हाती घेतले आहे. सात हजार झाडे लावली आहेत; परंतु या झाडांना अज्ञात युवकांनी लक्ष्य केले आहे. हा दुर्दैवी प्रकार थांबायला हवा. ज्यांनी झाडे जाळली त्यांना शासन व्हायला हवे.
- संजय शेवाळे,
पंचायत समिती सदस्य, निफाड

Web Title: Eat fifteen hundred trees in the fire of Lonjai Mountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.