तालुक्याच्या पूर्व भागात हाहाकार

By Admin | Updated: June 4, 2014 01:45 IST2014-06-04T01:29:12+5:302014-06-04T01:45:41+5:30

तालुक्याच्या पूर्व भागात हाहाकार

In the eastern part of Talukas | तालुक्याच्या पूर्व भागात हाहाकार

तालुक्याच्या पूर्व भागात हाहाकार

पळसे/चाडेगाव : जोरदारवादळी वार्‍यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात शेती, कौलारू व पत्र्यांची घरे, शेड आदिंचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तर विद्युत खांब वाकल्याने व विद्युत वाहिन्या तुटल्याने अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात आज दुपारी झालेल्या जोरदार वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाचे आगमन झाले. तसेच काही भागांत गारपीटदेखील झाली. शिंदे, पळसे, एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, हिंगणवेढे, जाखोरी, चांदगिरी आदि आजूबाजूच्या परिसरात वादळी वार्‍याने अक्षरश: थैमान घातल्याने फार मोठे नुकसान झाले आहे. पळसे नासाका कार्यस्थळावरील बैलगाडी, वजनकाटा, पत्र्याचे शेड वादळी वार्‍यात उडून गेले. तसेच शिंदे, पळसे येथील कौलारू व पत्र्याच्या घराचेदेखील नुकसान झाले आहे. वादळी वार्‍यात पत्रे, कौले उडून गेल्याने रहिवाशांना पावसाच्या पाण्यापासून संसारोपयोगी वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी धावपळ करावी लागत होती. पळसे, नासाका कार्यस्थळ व आजूबाजूच्या परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून व फांद्या तुटून पडलेल्या होत्या, तर लटकणार्‍या विद्युतवाहिन्या तुटून गेल्याने व विद्युत खांब वाकून गेल्याने पळसे, शिंदे, नासाका कार्यस्थळ, मळे विभागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. एकलहरा, सामनगाव, चाडेगाव, हिंगणवेढे, कोटमगाव, जाखोरी या भागातदेखील वादळी वार्‍यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतमालाचे खूप मोठे नुकसान झाले. टमाटे, कोबी, फ्लॉवर, मिरची, ऊस व भाजीपाल्याच्या शेतात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने शेतमालाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. हिंगणवेढे परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने सर्वच शेतमालाचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: In the eastern part of Talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.