पिंपळगाव बसवंत परिसरात वृक्षदिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 19:04 IST2019-07-10T19:04:35+5:302019-07-10T19:04:59+5:30

पिंपळगाव बसवंत :परिसरातील शिरवाडे वणी येथील कविश्रेष्ठ कुसुमाग्रज विद्यालयाच्या वतीने वृक्ष दिंडी काढण्यात आली. यावेळी पालक मेळावा, वृक्षारोपण आदी कार्यक्र म घेण्यात आले. तसेच माता पालक समिती, विशाखा समिती ,परिवहन समिती व शिक्षक पालक समिती आदी समित्या स्थापन करण्यात आल्या.

  Dynasty in Pimpalgaon Baswant area | पिंपळगाव बसवंत परिसरात वृक्षदिंडी

पिंपळगाव बसवंत परिसरात वृक्षदिंडी

प्रारंभी शिरवाडे गावात आषाढी एकादशी निमित्ताने प्रभात फेरी व वृक्ष दिंडी काढून विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना झाडे लावा ,झाडे जगवा ,वृक्ष लागवड काळाची गरज,वृक्ष संवर्धन,एक मूल तीस झाडे असा संदेश गावात वृक्ष दिंडी दरम्यान देण्यात आला. त्यानंतर गावात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी शिवाजी निफाडे, सोमनाथ बोरस्ते, नाना गांगुर्डे, भुसारे, मोरे, शेळके, नाटे आदींसह शिक्षिकवृंद व विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक बी. आर. कुशारे यांनी केले तर आभार प्रा. गुजरे यांनी मानले.

 

Web Title:   Dynasty in Pimpalgaon Baswant area

टॅग्स :Schoolशाळा