सायतरपाडा शिवारात विहिरीत पडून महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 17:47 IST2019-01-23T17:46:56+5:302019-01-23T17:47:10+5:30
मालेगाव : तालुक्यातील सायतरपाडा शिवारातील गट क्रमांक १०५ मधील विहिरीवर पाणी भरण्यास गेलेल्या शितल साहेबराव महाले (३५) या विवाहितेचा पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

सायतरपाडा शिवारात विहिरीत पडून महिलेचा मृत्यू
मालेगाव : तालुक्यातील सायतरपाडा शिवारातील गट क्रमांक १०५ मधील विहिरीवर पाणी भरण्यास गेलेल्या शितल साहेबराव महाले (३५) या विवाहितेचा पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. बुधवारी ही घटना घडली. शीतल महाले व त्यांचे पती शेतात काम करीत होते. पाण्याची तहान लागल्यानंतर शितल या नरेंद्र देशमुख यांच्या विहिरीवर पाणी भरण्यास गेल्या होत्या. मात्र त्या पाय घसरून विहिरीत पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक के. के. पाटील हे करीत आहेत.