झोका पडल्याने बालकाचा जागेवर मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 18:50 IST2019-04-12T18:49:35+5:302019-04-12T18:50:15+5:30
पिंपळगाव बसवंत : शहरातील राम मंदिर जवळ कालिका माता मंदिरात झोका खेळत असताना झोक्याचा सांगाडा डोक्यावर पडल्याने विशाल डंबाळे हा मुलगा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस स्टेशन मध्ये अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत विशाल डंबाळे
पिंपळगाव बसवंत : शहरातील राम मंदिर जवळ कालिका माता मंदिरात झोका खेळत असताना झोक्याचा सांगाडा डोक्यावर पडल्याने विशाल डंबाळे हा मुलगा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस स्टेशन मध्ये अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विशाल मल्हारी डंबाळे (१२) रा. अंबिका नगर व मित्र पिंपळगाव हायस्कुल मध्ये ६ वी इयतेत शिकत होते शाळा १२ वाजता सुटल्या नंतर घरी जात असताना कालिका माता मंदिरात झोका खेळण्यासाठी गेले असता तो झोका सांगाड्यासह खाली पडला होता विशाल मल्हारी डंबाळे व मित्रांनी तो उचलून ठेवत झोका खेळला मित्र झोका खेळून निघून गेले मात्र विशाल मल्हारी डंबाळे हा झोका खेळत असताना झोक्याचा सांगाडा डोक्यावर पडल्याने विशालच जागीच मृत्यू झाला. विशाल हाच आई मंगलबाईचा आधार होता. कारण विशालच्या वडीलांनी तोे तीन महिन्याचा असतानाच फारकत दिली असुन आई मोलमजुरी करून विशाल व मोनीकाचे पालन पोषण करीत आहे. सदर जागी घटना घडली त्या गार्डनची जागा ग्रामपंचायतच्या जागेवर असुन या जागेचा बालोद्यान म्हणून वापर होता, मात्र मुलांना खेळाच्या साहित्याची अवस्था बराच वर्षांपासुन वाईट झाली आहे. यातच विशालचा झालेला मृत्यु हा अंबीका नगरला चटका लावून गेला आहे. याबाबत पिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरिक्षक संपत शिंदे याचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार पंडीत वाघ करत आहे.