नाशिक : पुलवामासह देशभरात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता म्हणून द्वारका ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे शहीद निधीसाठी ५ हजार रुपयांचा निधी जमा केला. सदर निधी प्रभारी जिल्हाधिकारी नीलेश सागर आणि सैनिक बोर्डचे घुले यांच्याकडे सुपूर्द केला. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कुलकर्णी, कार्याध्यक्ष धनंजय चतूर, सचिव भाऊसाहेब सोनवणे, कोषाध्यक्ष चंद्रकांत व्यवहारे, अॅड. प्रकाश काळे, शशिकांत उपासनी, कुरुमबट्टी, येडगावकर आणि पदाधिकारी उपस्थित होेते. संघटनेच्या या उपक्रमाचे जिल्हाधिकाºयांनी कौतुक केले.
द्वारका ज्येष्ठ नागरिकांचे शहीद निधीसाठी योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:07 IST