चांदवड तालुक्यातील देवरगाव, जोपुळला गारपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 17:36 IST2018-10-03T17:34:14+5:302018-10-03T17:36:12+5:30
चांदवड : चांदवड तालुक्यात देवरगाव , जोपूळ परिसरात परतीच्या पावसाने मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार गारपीट होऊन द्राक्ष उत्पादक शेतकरी काही घराचे पत्रे उडाले तर पोल्ट्री फार्मचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली . अचानक ढग जमा झाले व विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाल्याने द्राक्षबागाचे प्रंचड नुकसान झाले.

चांदवड तालुक्यातील देवरगाव, जोपुळला गारपीट
चांदवड : चांदवड तालुक्यात देवरगाव , जोपूळ परिसरात परतीच्या पावसाने मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार गारपीट होऊन द्राक्ष उत्पादक शेतकरी काही घराचे पत्रे उडाले तर पोल्ट्री फार्मचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली . अचानक ढग जमा झाले व विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाल्याने द्राक्षबागाचे प्रंचड नुकसान झाले.पावसात रामराव मोरे, सुर्यभान रेवजी शिंदे, साहेबराव वामन काकडे आदिसह असंख्य शेतकऱ्यांचे द्राक्षबांगाचे नुकसान झाले. बाबुराव दगडू कदम यांच्या पोल्ट्री फार्मचे सर्वच पत्रे उडून गेले . दीपक गांगुर्डे यांच्या घराववर निंबाचे झाड कोसळले सुदैवाने जीवतहानी झाली नाही.रस्त्यातच बरीच झाडे कोसळली होती तर जनजीवन विस्कळीत झाले.मका पीक पुर्णपणे आडवे पडले. तर जोपुळ व दरसवाडी येथेही काही प्रमाणात गारपीट झाली असून या वर्षी चांदवड तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून शेवटी शेवटी परतीच्या पावसाने असे नुकसान केल्याने पुढील वर्षाचे आर्थिक गणित कोलमडणार असल्याचे शेतकºयानंी सांगीतले. तर काही शेतकºयांनी दसरा, दिवाळीसाठी झेंडू फूलाचे उत्पादन घेतले या पाऊस व गारपीटीने झेंडू पीक आडवे पडल्याने मोठे नुकसान झाले असून शासनाने त्वरीत पंचनामे करुन शेतकºयाना दिलासा द्यावा अशी मागणी सरपंच धनश्री शिंदे व नागरीकांनी केली आहे.