दत्तू भोकनळ यांचा सत्कार

By Admin | Updated: September 11, 2016 01:11 IST2016-09-11T01:10:42+5:302016-09-11T01:11:19+5:30

दत्तू भोकनळ यांचा सत्कार

Duttu Bhokanal felicitated | दत्तू भोकनळ यांचा सत्कार

दत्तू भोकनळ यांचा सत्कार

नांदगाव : रिओ आॅलंपीकमध्ये नाव कमविणाऱ्या रोर्इंगपटू दत्तू बबन भोकनळचा सत्कार येथील महाविद्यालयात करण्यात आला. यावेळी मविप्र संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ.पी.आर. भाबड तसेच विभागीय अधिकारी कचरे, तहसीलदार रचना पवार, तालुका बाजार समितीचे सदस्य हनुमंत सानप, शिवस्पर्श गणेश मंडळाचे अध्यक्ष रोहन सांगळे व प्रेम उगले, सहाय्यक निबंधक कार्यालयाचे एस के सोनवणे ,दिपक शिंदे माजी सैनिक संघटना अध्यक्ष नाना काकळीज व युवा फाउंडेशन सामाजिक मंडळाचे सुमित सोनवणे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.पी.आर.भाबड यांनी प्रास्ताविक केले.व प्रमुख अतिथींचे स्वागत केले व दत्तु भोकनळ यांना पुढील टोकियोत होणार्Þया आॅलंपिकसाठी महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न व शंकांचे समाधान करून घेतले.
या महाविद्यालयातील पायल पळशीकर, वर्षा सातपुते ,गीता भावसार,गायत्री पैठणकर ,पायल शर्मा,भाग्यश्री खैरनार, मनोज सानप,मेघा पवार,वैभव गुप्ता या राष्ट्रीय व राज्य पातलीवर विविध खेळात नाव कमावलेल्या महाविद्यालयाच्या खेलाडुंचा दत्तु भोकनळ यांच्या हस्ते सत्कार केला कार्यक्र माचे सुत्रसंचालन प्रा दिनेश उकिर्डे यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा संजय मराठे यांनी मानले यावेळी माजी सैनिक संघटनेचे सैनिक युवा फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते तसेच विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Duttu Bhokanal felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.