शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कालिदाससमोरील ‘दुष्यंत-शकुंतला’ शिल्प अद्यापही अडगळीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : महाकवी कालिदास यांच्या ‘अभिज्ञानशाकुंतलम्‌’ या जगविख्यात साहित्यकृतीचे शिल्प प्रत्येक रसिकाची दाद मिळवत असे. मात्र, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : महाकवी कालिदास यांच्या ‘अभिज्ञानशाकुंतलम्‌’ या जगविख्यात साहित्यकृतीचे शिल्प प्रत्येक रसिकाची दाद मिळवत असे. मात्र, कालिदास कलामंदिराबाहेरील एका छोट्याशा वाटिकासदृश जागेत वनविहार करणाऱ्या शकुंतलेवर मोहीत होणारा राजा दुष्यंत, असे ते सुंदर शिल्प आधी डागडुजीच्या नावाखाली हलवले गेले. नंतर कोट्यवधी खर्च करून कालिदास कलामंदिराचे नूतनीकरणदेखील होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला. आता तर कालिदास बाहेरील ती वाटिकाच (आयलँड) नामशेष होऊन त्या जागेवरील अप्रतिम शिल्प स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावासमोरील महापालिकेच्या जागेत अडगळीत अखेरच्या घटका मोजत आहे. मात्र, ना मनपा प्रशासनाला त्याचा खेद, ना महापालिकेच्या धुरीणांना खंत.

आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. कालिदास हे संस्कृतचे महान कवी आणि रचनाकार, नाटककार होते. किंबहुना भारताच्या ज्ञात इतिहासातील सर्वकालीन श्रेष्ठ महाकवी म्हणून त्यांना गौरविले जाते. कवी कुलगुरू कालिदासांच्या रघुवंश, मेघदूतम‌, कुमारसंभव, अभिज्ञानशाकुंतलम्‌, ऋतुसंहार या रचना कालातीत ठरल्या. अशा या महाकवीच्या नावाने साकारण्यात आलेल्या कालिदास कलामंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच हे दुष्यंत-शकुंतलेचे मनोहारी शिल्प या कलामंदिराच्या प्रवेशद्वारावरच रसिकांची दाद घेऊन जात असे. त्या शिल्पाच्या कलाकृतीवर बाहेरून नाटकांसाठी येणारे मोठमोठे कलाकार, अभिनेतेदेखील लुब्ध होऊन प्रशंसा करायचे. एकुणातच ते शिल्प हे कालिदास कलामंदिराचे वेगळेपण तसेच नाशिककरांच्या रसिकतेचे दर्शन घडवत प्रदीर्घ काळ उभे होते.

इन्फो

निदान कलामंदिराच्या उद्यानात तरी द्यावे स्थान

कालिदासच्या नूतनीकरणानंतर आता तर कालिदाससमोरील रस्त्याचेही नूतनीकरण पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. पण डागडुजीच्या नावाखाली हलवले गेलेले शिल्प पुन्हा परत बसवलेच गेले नसल्याची खंत रसिक नाशिककरांना लागली आहे. नूतनीकृत रस्त्यावर शक्य नसल्यास कालिदास कलामंदिराच्या आवारातील उद्यानात तरी ते शिल्प महापालिकेच्या धुरीणांनी पुन्हा बसवून नाशिककरांच्या रसिकतेचा प्रत्यय देणारे शिल्प पुन्हा साकारावे अशीच समस्त नाशिककर रसिकांची इच्छा आहे.

इन्फो

म्हणून दिले नाव महाकवी कालिदासाचे

या कलामंदिराच्या जागेवर पूर्वी तमाशा थिएटर होते. त्या जागेवर नाट्यमंदिर उभारायचा निर्णय घेऊन त्याला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे नाव देण्याचा निर्णयही मनपाच्या तत्कालीन धुरीणांनी घेतला होता. मात्र, स्वत: तात्यासाहेबांनी या नाट्यमंदिरास आपले नाव नको, तर कवी कुलगुरू कालिदास यांचे नाव देण्यास सांगितले. त्यामुळेच त्या नाट्यमंदिराचे नामकरण कालिदास नाट्यमंदिर असे झाले होते.

इन्फो

कालिदास दिनाचे माहात्म्य

कालिदास यांच्या काल निश्चितीबाबत अभ्यासकांमध्ये मतभेद असले तरी ते भारताचे सर्वश्रेष्ठ महाकवी होते, हे भारतीयच नव्हे तर जर्मनीचा जगविख्यात महाकवी गटेनेदेखील मान्य केले होते. कालिदासांच्या ‘मेघदूतम्’ या खण्डकाव्यात त्यांनी आषाढातील पहिल्या दिवशी यक्षाने पाहिलेल्या अजस्र, मत्त हत्तीसारख्या आकाराच्या पावसाळी ढगाचे वर्णन केले आहे. आपल्या पत्नीच्या विरहाने व्याकूळ झालेल्या यक्षाने या मेघरूपी गजराजालाच आपला दूत बनवून स्वतःची ख्यालीखुशाली कळवण्यासाठी आपल्या पत्नीकडे धाडलेला आहे. ही कल्पना संस्कृत साहित्यात पुढे इतकी वाखाणली गेली की यात वर्णन केलेले पहिलेच शब्द आषाढस्य प्रथम दिवसे हाच ‘कालिदास दिन’ म्हणूनच साजरा होऊ लागला.

---------------

कविकुलगुरू कालिदास दिन विशेष

(फोटो राजू ठाकरे देणार आहेत)