विंचूर-लासलगाव रस्त्याची दुरवस्था
By Admin | Updated: October 24, 2016 23:46 IST2016-10-24T23:46:01+5:302016-10-24T23:46:30+5:30
विंचूर-लासलगाव रस्त्याची दुरवस्था

विंचूर-लासलगाव रस्त्याची दुरवस्था
विंचूर : विंचूर-लासलगाव रस्त्याची दुरवस्था झाली असून, सदर रस्त्याची येत्या आठ दिवसांत तत्काळ दुरु स्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन देण्यात आले आहे.
या रस्त्याच्या डागडुजीबाबत संबंधितांना अनेकदा निवेदन व तोंडी सांगूनही नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सणासुदीच्या पाशर््वभूमीवर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे व नागरिकांना या त्रासातुन मुक्त करावे.यावेळी ज्ञानेश्वर पवार, प्रकाश पाटील, विंचूर ग्रामपालिका सदस्य नानासाहेब जेऊघाले, निलेश गायकवाड, संदिप सोनवणे, योगेश काळे, बापुसाहेब डुंबरे, वाल्मिक लांडबले, सद्दाम शेख, प्रमोद धंद्रे, पप्पु सुर्यवंशी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)