दारणातून विसर्ग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 12:06 AM2018-11-04T00:06:29+5:302018-11-04T00:10:15+5:30

नाशिक : जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी दारणा धरणातून सलग तिसऱ्या दिवशीही विसर्ग सुरूच ठेवला असून, गोदावरीतून डोळ्यादेखत पाणी पुढे जात असल्याचे पाहून नाशिक व नगरच्या शेतकºयांनी कोल्हापूर टाइप बंधाºयांच्या ठिकठिकाणी फळ्या टाकून पाणी अडविण्यास सुरुवात केल्याने पाटबंधारे खात्यासमोर नवीनच पेच उभा राहिला आहे.

Durga's departure started | दारणातून विसर्ग सुरूच

दारणातून विसर्ग सुरूच

Next
ठळक मुद्देशेतकºयांनी एकत्र येत फळ्या आडव्या टाकून पाणी अडविण्याचे प्रकार सुरू केले आहे.

नाशिक : जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी दारणा धरणातून सलग तिसऱ्या दिवशीही विसर्ग सुरूच ठेवला असून, गोदावरीतून डोळ्यादेखत पाणी पुढे जात असल्याचे पाहून नाशिक व नगरच्या शेतकºयांनी कोल्हापूर टाइप बंधाºयांच्या ठिकठिकाणी फळ्या टाकून पाणी अडविण्यास सुरुवात केल्याने पाटबंधारे खात्यासमोर नवीनच पेच उभा राहिला आहे.
गुरुवारपासून नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणामधून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील गंगापूर व पालखेड धरणातून पाणी सोडण्याऐवजी दारणा धरणातून पाणी सोडण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आल्याने त्यानुसार शनिवारी सायंकाळपर्यंत दारणामधून सुमारे १७०० दशलक्ष घनफूट इतके पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आले आहे. रात्री ११ वाजेपर्यंत जायकवाडीत ते पोहोचेल, असे पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. दारणातून एकीकडे हे पाणी सोडले जात असताना दुसरीकडे मुकणेमधून दारणात पाणी वळते केले जात आहे. जायकवाडीसाठी एकट्या दारणातूनच पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे आणखी सव्वा टीएमसी पाणी दोन दिवसांत सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे.
त्यामुळे जायकवाडीपर्यंत पाणी पोहोचण्यास विलंब होत असून, अशा कोल्हापूर बंधाºयावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी, गावकरी त्यांना जुमानत नसल्याने वादाचे प्रसंग उद्भवू लागले असल्याने पाटबंधारे खात्याची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे दारणाचे पाणी आणखी किती दिवस सोडले जाईल ते जाहीर करण्यास पाटबंधारे खात्याचे अधिकारी राजी नाहीत. संवेदनशील मुद्दापर्जन्यमान कमी झाल्याने पाण्याचा मुद्दा संवेदनशील झाला असून, ठिकठिकाणी पाणी सोडण्याच्या विरोधात आंदोलने होऊ लागली आहेत. अशातच गोदावरीत बांधण्यात येणाºया कोल्हापूर टाइप बंधाºयाच्या फळ्या पाणी सोडण्यापूर्वी काढण्यात आल्या होत्या. आता गोदावरी वाहत असल्याचे पाहून शेतकºयांनी एकत्र येत फळ्या आडव्या टाकून पाणी अडविण्याचे प्रकार सुरू केले आहे.

दारणातून विसर्ग सुरूचनाशिक : जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी दारणा धरणातून सलग तिसऱ्या दिवशीही विसर्ग सुरूच ठेवला असून, गोदावरीतून डोळ्यादेखत पाणी पुढे जात असल्याचे पाहून नाशिक व नगरच्या शेतकºयांनी कोल्हापूर टाइप बंधाºयांच्या ठिकठिकाणी फळ्या टाकून पाणी अडविण्यास सुरुवात केल्याने पाटबंधारे खात्यासमोर नवीनच पेच उभा राहिला आहे.
गुरुवारपासून नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणामधून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील गंगापूर व पालखेड धरणातून पाणी सोडण्याऐवजी दारणा धरणातून पाणी सोडण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आल्याने त्यानुसार शनिवारी सायंकाळपर्यंत दारणामधून सुमारे १७०० दशलक्ष घनफूट इतके पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आले आहे. रात्री ११ वाजेपर्यंत जायकवाडीत ते पोहोचेल, असे पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. दारणातून एकीकडे हे पाणी सोडले जात असताना दुसरीकडे मुकणेमधून दारणात पाणी वळते केले जात आहे. जायकवाडीसाठी एकट्या दारणातूनच पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे आणखी सव्वा टीएमसी पाणी दोन दिवसांत सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे.
त्यामुळे जायकवाडीपर्यंत पाणी पोहोचण्यास विलंब होत असून, अशा कोल्हापूर बंधाºयावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी, गावकरी त्यांना जुमानत नसल्याने वादाचे प्रसंग उद्भवू लागले असल्याने पाटबंधारे खात्याची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे दारणाचे पाणी आणखी किती दिवस सोडले जाईल ते जाहीर करण्यास पाटबंधारे खात्याचे अधिकारी राजी नाहीत. संवेदनशील मुद्दापर्जन्यमान कमी झाल्याने पाण्याचा मुद्दा संवेदनशील झाला असून, ठिकठिकाणी पाणी सोडण्याच्या विरोधात आंदोलने होऊ लागली आहेत. अशातच गोदावरीत बांधण्यात येणाºया कोल्हापूर टाइप बंधाºयाच्या फळ्या पाणी सोडण्यापूर्वी काढण्यात आल्या होत्या. आता गोदावरी वाहत असल्याचे पाहून शेतकºयांनी एकत्र येत फळ्या आडव्या टाकून पाणी अडविण्याचे प्रकार सुरू केले आहे.

Web Title: Durga's departure started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी