दुर्गा देवरे हिला यूथ गेममध्ये दुसरे सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 01:51 IST2019-01-14T01:51:02+5:302019-01-14T01:51:27+5:30
वाजगाव येथील आंतरराष्ट्रीय धावपटू दुर्गा प्रमोद देवरे हिने पुण्यात सुरू असलेल्या यूथ गेममध्ये रविवारी महाराष्ट्राला ४ बाय ४०० मीटर रिले स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले. या स्पर्धेतील दुर्गाचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.

दुर्गा देवरे हिला यूथ गेममध्ये दुसरे सुवर्ण
देवळा : तालुक्यातील वाजगाव येथील आंतरराष्ट्रीय धावपटू दुर्गा प्रमोद देवरे हिने पुण्यात सुरू असलेल्या यूथ गेममध्ये रविवारी महाराष्ट्राला ४ बाय ४०० मीटर रिले स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले. या स्पर्धेतील दुर्गाचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. स्पर्धा सुरू होण्याच्या एक तास आधी ८०० मीटर धावण्याच्या अंतिम स्पर्धेत दुर्गाला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. दुर्गाने यापूर्वी चीन, जपान, फिनलंड, श्रीलंका, दोहा, कतार आदी स्पर्धांत पदकांची कमाई केली आहे. प्रशिक्षक विजेंदर सिंग यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे.