शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

दत्त मंदिर रोडवरील मोकळा भूखंड बनला डम्पिंग ग्राउंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 1:56 AM

दत्त मंदिर रोडवरील एसटी महामंडळाचा मोकळा भूखंड डम्पिंग ग्राउंड बनल्याने परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोकळ्या भूखंडावरील झाडाझुडपांमध्ये अनेक गैरप्रकार चालत असल्याने पोलीस आयुक्त व मनपा आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

नाशिकरोड : दत्त मंदिर रोडवरील एसटी महामंडळाचा मोकळा भूखंड डम्पिंग ग्राउंड बनल्याने परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोकळ्या भूखंडावरील झाडाझुडपांमध्ये अनेक गैरप्रकार चालत असल्याने पोलीस आयुक्त व मनपा आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.  दत्त मंदिर रोडवरील भर लोकवस्तीत एसटी महामंडळाचा भूखंड कुंपणाअभावी मोकळा पडून आहे. त्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात बाभळीच्या झाडांचे जंगल वाढले आहे. इमारतीच्या बांधकामासाठी खोदाई करताना निघालेली माती किंवा इमारत तोडल्याचे रॅबिट या मोकळ्या भूखंडावर आणून टाकले जात असल्याने मातीचे व रॅबिटचे छोटे-छोटे डोंगर तयार झाले आहेत. मनपाचे रस्ते, गटारी आदी कामातील खोदाईची माती या ठिकाणी आणून टाकली जाते. तसेच सोमाणी उद्यान परिसरातील विक्रेते, अनेक हॉटेल, हातगाडी चालक उरलेले अन्नपदार्थ आणून टाकतात. त्यामुळे मोकाट कुत्रे, जनावरे व दुर्गंधीचा उपद्रव रहिवाशांना सहन करावा लागत आहे. मनपाकडून सार्वजनिक ठिकाणी केरकचरा, माती टाकणाºयांवर कारवाई केली जात नसल्याने एसटी महामंडळाचा भर लोकवस्तीत असलेला हा मोकळा भूखंड डम्पिंग ग्राउंड झाला आहे. यामुळे परिसरातील रहिवासी, विकास मतिमंद शाळेचे विद्यार्थी व मनपा शाळा क्र. १२५ च्या मैदानावर फिरण्यास येणारे नागरिक, महिला त्रस्त झाल्या आहेत. मनपाने एसटी महामंडळ प्रशासनास मोकळ्या भूखंडास कम्पाउंड करण्याची नोटीस बजावून कारवाई करावी, तसेच जंगलासारखी वाढलेली व गैरप्रकाराला आमंत्रण देणारी बाभळीची झाडे तोडण्यात यावी. मनपा आयुक्तांनी यात गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहे.पोलीस आयुक्तांनी लक्ष घालावेएसटी महामंडळाच्या या मोकळ्या भूखंडाच्या एका बाजूला कुंभमेळ्यात वर्कशॉप बांधण्यात आले होते. वर्कशॉपची इमारत पडून असल्याने तेथे मद्यपी व जुगारी टोळके बसत आहे. तसेच मोकळ्या भूखंडावरील बाभळीच्या झाडाच्या जंगलात गांजा, दारू, व्हाइटनर आदी अमली पदार्थ पिणारे बसलेले असतात. तसेच प्रेमीयुगुलांचे येथे अश्लील चाळे चालतात. त्यामुळे स्थानिक महिलांना खाली मान घालून जाण्याची वेळ येते. पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत येत असल्याने हे टवाळखोर पोलीस येण्याअगोदरच पळून जातात. पोलीस आयुक्तांनीच लक्ष घालून या ठिकाणी चालणाºया गैरप्रकाराला आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका