शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

वारकऱ्यांच्या मार्गात पोलिसांचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:23 IST

शहरामार्गे त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथांच्या भेटीला विविध जिल्ह्यांमधून मार्गस्थ होणाºया वारक ºयांच्या दिंडी मार्गात पोलिसांनी मंगळवारी (दि.२९) अडथळा निर्माण केला. भजन, भक्तिगीते वाजविण्यावर आक्षेप घेत आयुक्तालयासमोरून मार्गस्त होताना ध्वनिक्षेपक बंद ठेवण्याच्या सूचना दिल्याने वारकरी संतप्त झाल्याचा प्रकार पहावयास मिळाला.

नाशिक : शहरामार्गे त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथांच्या भेटीला विविध जिल्ह्यांमधून मार्गस्थ होणाºया वारक ºयांच्या दिंडी मार्गात पोलिसांनी मंगळवारी (दि.२९) अडथळा निर्माण केला. भजन, भक्तिगीते वाजविण्यावर आक्षेप घेत आयुक्तालयासमोरून मार्गस्त होताना ध्वनिक्षेपक बंद ठेवण्याच्या सूचना दिल्याने वारकरी संतप्त झाल्याचा प्रकार पहावयास मिळाला.  अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाकापर्यंत स्मार्टरोडचे काम सुरू आहे. यामुळे पंचवटी भागातून येणाºया दिंड्यांना रविवार कारंजा, अशोकस्तंभमार्गे गंगापूररोडने पुढे मार्गस्थ केले जात आहे. त्यामुळे वारकºयांना संत निवृत्तिनाथांच्या भेटीला जाण्यासाठी वळसा घालत जावे लागत आहे. त्र्यंबक रस्त्यावर किंवा त्र्यंबकनाक्यावर वाहतूक कोंडी दिंड्यांमुळे विस्कळीत होऊ नये,  यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र अशोकस्तंभावरून पुढे पोलीस आयुक्तालयाच्या दारावरून मार्गस्थ होणाºया वारकºयांच्या दिंडीला पोलिसांनी थांबवून अशोकस्तंभापासून पुढे ध्वनिक्षेपक वाजवू नये, अशी सूचना काही पोलीस कर्मचाºयांनी वारकºयांना केली. यामुळे वारकरी संतप्त झाले. वारकºयांनी आयुक्तालयासमोरून मार्गस्थ होत असताना जोरदार घोषणा देत संत निवृत्तिनाथ महाराज यांचा जयघोष केला. वारकºयांच्या भजनाला नेमका आक्षेप कशासाठी घेतला? असा प्रश्न वारकºयांनी पोलीस आयुक्तांना विचारला आहे.शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार दरवर्षी त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथांच्या यात्रेसाठी हजारो वारकरी पौष महिन्याच्या एकादशीपूर्व दाखल होतात. यासाठी नाशिकमार्गे शेकडो दिंड्या त्र्यंबकच्या दिशेने संतनामाचा जयघोष करत मार्गस्थ होतानाचे चित्र मागील दोन दिवसांपासून पहावयास मिळत आहे. वारकºयांचा शहरात ठिकठिकाणी मुक्काम होता. दुपारच्या सुमारास काही दिंड्यांमधील वारकºयांना रविवार कारंजा येथे पोलिसांनी रोखून धरले, तर अशोकस्तंभापासून पुढे मार्गस्थ होताना ध्वनिक्षेपक बंद करण्याच्या सूचना केल्यामुळे वारकरी प्रचंड नाराज झाले. टाळ-मृदंगांच्या तालावर संतनामाचा जयघोष का थांबविला गेला? असा प्रश्न संतभेटीला निघालेल्या वारकºयांनी शहर पोलीस प्रशासनाला विचारला आहे.‘वरतून आदेश आहे...’ध्वनिक्षेपक वाजविण्यास मज्जाव करण्यात आला तेव्हा वारकºयांनी त्यास आक्षेप घेत त्याबाबत काही लेखी आदेश काढण्यात आला आहे का? असा प्रश्न विचारला असता संबंधित पोलीस कर्मचाºयांनी ‘वरतून आदेश आले आहे, तुम्ही अशोकस्तंभापासून पुढे ध्वनिक्षेपक बंद ठेवा’ असे सुनावले. यामुळे वारकरी चांगलेच संतप्त झाले. आयुक्तालयासमोरून दिंडी पुढे नेणार नसल्याचा पवित्राही काही वेळ वारक-यांनी घेतला होता.मागील ५३ वर्षांपासून मालेगाव तालुक्यातील रावळगाव ते त्र्यंबकेश्वर अशी दिंडी नेण्याची परंपरा जोपासली जात आहे. दिंडीत सुमारे तीनशे वारकरी सहभागी होते. अशोकस्तंभाजवळ एका पोलीस कर्मचाºयाने येऊन ध्वनिक्षेपक बंद करण्याची सूचना केली. यावेळी त्यांच्या सूचनेचा मान राखला व ध्वनिक्षेपक बंद केला. पोलीस आयुक्तालयापुढे येऊन काही वेळ थांबून वरिष्ठ अधिकाºयांना याबाबत विचारणा केली असता पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाºयाने उडवाउडवीचे उत्तरे देत जुना गंगापूरनाक्यापर्यंत ध्वनिक्षेपक बंद ठेवा, असा आदेश असल्याचे सांगितले. नाशिकसारख्या धार्मिक पुण्यनगरीत अशाप्रकारची वागणूक वारक-यांना मिळणे हे निंदणीय आहे.- वासुदेव महाराज सोनवणे, दिंडीप्रमुख

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरNashikनाशिक