वारकऱ्यांच्या मार्गात पोलिसांचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 01:22 AM2019-01-30T01:22:34+5:302019-01-30T01:23:19+5:30

शहरामार्गे त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथांच्या भेटीला विविध जिल्ह्यांमधून मार्गस्थ होणाºया वारक ºयांच्या दिंडी मार्गात पोलिसांनी मंगळवारी (दि.२९) अडथळा निर्माण केला. भजन, भक्तिगीते वाजविण्यावर आक्षेप घेत आयुक्तालयासमोरून मार्गस्त होताना ध्वनिक्षेपक बंद ठेवण्याच्या सूचना दिल्याने वारकरी संतप्त झाल्याचा प्रकार पहावयास मिळाला.

 Dump police in the way of Warkaris | वारकऱ्यांच्या मार्गात पोलिसांचा खोडा

वारकऱ्यांच्या मार्गात पोलिसांचा खोडा

Next

नाशिक : शहरामार्गे त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथांच्या भेटीला विविध जिल्ह्यांमधून मार्गस्थ होणाºया वारक ºयांच्या दिंडी मार्गात पोलिसांनी मंगळवारी (दि.२९) अडथळा निर्माण केला. भजन, भक्तिगीते वाजविण्यावर आक्षेप घेत आयुक्तालयासमोरून मार्गस्त होताना ध्वनिक्षेपक बंद ठेवण्याच्या सूचना दिल्याने वारकरी संतप्त झाल्याचा प्रकार पहावयास मिळाला.  अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाकापर्यंत स्मार्टरोडचे काम सुरू आहे. यामुळे पंचवटी भागातून येणाºया दिंड्यांना रविवार कारंजा, अशोकस्तंभमार्गे गंगापूररोडने पुढे मार्गस्थ केले जात आहे. त्यामुळे वारकºयांना संत निवृत्तिनाथांच्या भेटीला जाण्यासाठी वळसा घालत जावे लागत आहे. त्र्यंबक रस्त्यावर किंवा त्र्यंबकनाक्यावर वाहतूक कोंडी दिंड्यांमुळे विस्कळीत होऊ नये,  यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र अशोकस्तंभावरून पुढे पोलीस आयुक्तालयाच्या दारावरून मार्गस्थ होणाºया वारकºयांच्या दिंडीला पोलिसांनी थांबवून अशोकस्तंभापासून पुढे ध्वनिक्षेपक वाजवू नये, अशी सूचना काही पोलीस कर्मचाºयांनी वारकºयांना केली. यामुळे वारकरी संतप्त झाले. वारकºयांनी आयुक्तालयासमोरून मार्गस्थ होत असताना जोरदार घोषणा देत संत निवृत्तिनाथ महाराज यांचा जयघोष केला. वारकºयांच्या भजनाला नेमका आक्षेप कशासाठी घेतला? असा प्रश्न वारकºयांनी पोलीस आयुक्तांना विचारला आहे.
शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार दरवर्षी त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथांच्या यात्रेसाठी हजारो वारकरी पौष महिन्याच्या एकादशीपूर्व दाखल होतात. यासाठी नाशिकमार्गे शेकडो दिंड्या त्र्यंबकच्या दिशेने संतनामाचा जयघोष करत मार्गस्थ होतानाचे चित्र मागील दोन दिवसांपासून पहावयास मिळत आहे. वारकºयांचा शहरात ठिकठिकाणी मुक्काम होता. दुपारच्या सुमारास काही दिंड्यांमधील वारकºयांना रविवार कारंजा येथे पोलिसांनी रोखून धरले, तर अशोकस्तंभापासून पुढे मार्गस्थ होताना ध्वनिक्षेपक बंद करण्याच्या सूचना केल्यामुळे वारकरी प्रचंड नाराज झाले. टाळ-मृदंगांच्या तालावर संतनामाचा जयघोष का थांबविला गेला? असा प्रश्न संतभेटीला निघालेल्या वारकºयांनी शहर पोलीस प्रशासनाला विचारला आहे.
‘वरतून आदेश आहे...’
ध्वनिक्षेपक वाजविण्यास मज्जाव करण्यात आला तेव्हा वारकºयांनी त्यास आक्षेप घेत त्याबाबत काही लेखी आदेश काढण्यात आला आहे का? असा प्रश्न विचारला असता संबंधित पोलीस कर्मचाºयांनी ‘वरतून आदेश आले आहे, तुम्ही अशोकस्तंभापासून पुढे ध्वनिक्षेपक बंद ठेवा’ असे सुनावले. यामुळे वारकरी चांगलेच संतप्त झाले. आयुक्तालयासमोरून दिंडी पुढे नेणार नसल्याचा पवित्राही काही वेळ वारक-यांनी घेतला होता.
मागील ५३ वर्षांपासून मालेगाव तालुक्यातील रावळगाव ते त्र्यंबकेश्वर अशी दिंडी नेण्याची परंपरा जोपासली जात आहे. दिंडीत सुमारे तीनशे वारकरी सहभागी होते. अशोकस्तंभाजवळ एका पोलीस कर्मचाºयाने येऊन ध्वनिक्षेपक बंद करण्याची सूचना केली. यावेळी त्यांच्या सूचनेचा मान राखला व ध्वनिक्षेपक बंद केला. पोलीस आयुक्तालयापुढे येऊन काही वेळ थांबून वरिष्ठ अधिकाºयांना याबाबत विचारणा केली असता पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाºयाने उडवाउडवीचे उत्तरे देत जुना गंगापूरनाक्यापर्यंत ध्वनिक्षेपक बंद ठेवा, असा आदेश असल्याचे सांगितले. नाशिकसारख्या धार्मिक पुण्यनगरीत अशाप्रकारची वागणूक वारक-यांना मिळणे हे निंदणीय आहे.
- वासुदेव महाराज सोनवणे, दिंडीप्रमुख

Web Title:  Dump police in the way of Warkaris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.