लोहमार्गावर जनावरे आल्याने रेल्वेची वाहतूक तासभर उशिराने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 22:26 IST2022-07-16T22:26:00+5:302022-07-16T22:26:30+5:30
मनमाड : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील लहावीत ते नाशिक रोड रेल्वे स्थानकादरम्यान लोहमार्गावर जनावरे आल्याने या मार्गाहून धावणारे प्रवासी रेल्वे गाड्या जवळपास एक तास उशिराने धावत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली. यामुळे प्रवाशांना खोळंबा होत असल्याचे चित्र मनमाड रेल्वे स्थानकात पाहावयास मिळाले. या मार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाले होते.

लोहमार्गावर जनावरे आल्याने रेल्वेची वाहतूक तासभर उशिराने
मनमाड : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील लहावीत ते नाशिक रोड रेल्वे स्थानकादरम्यान लोहमार्गावर जनावरे आल्याने या मार्गाहून धावणारे प्रवासी रेल्वे गाड्या जवळपास एक तास उशिराने धावत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली. यामुळे प्रवाशांना खोळंबा होत असल्याचे चित्र मनमाड रेल्वे स्थानकात पाहावयास मिळाले. या मार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाले होते.
गाडी क्र. १२६१७ एर्नाकुलम-निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस ही प्रवासी रेल्वेगाडी मुंबईहून मनमाडकडे येत असताना लहवीत ते नाशिकरोड रेल्वे स्थानकादरम्यान लोहमार्गावर जनावरे (कॅटल) आल्याने ही १ तास १५ मिनिटे उशिराने धावत होती. तसेच त्यामागून येणारे रेल्वेगाडी क्र. ११०२६ पुणे-भुसावळ एक्स्प्रेस १ तास उशिराने आणि गाडी क्र. १३२०२ कुर्ला-पटना एक्स्प्रेस ४० मिनिट उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.