शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

जल कुंभाचा स्लॅब कोसळल्याने देवळा पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: February 2, 2015 00:21 IST

जल कुंभाचा स्लॅब कोसळल्याने देवळा पाणीपुरवठा बंद

देवळा : मुख्य जलकुंभाचा स्लॅब कोसळल्याने देवळा शहरासह आठ गावांना पाणीपुरवठा करणारी नडगाव सामुदायिक पाणीपुरवठा योजने अंतर्गत या गावांचा पाणीपुरवठा संपूर्णपणे बंद झाल्याने नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाणीपुरवठा दोन-तीन दिवसात दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ववत सुरू होईल असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.देवळा नऊगाव पाणीपुरवठा योजना ही ६ नोव्हेंबर १९७१ रोजी कार्यान्वित करण्यात आली होती. त्यावेळच्या लोकसंख्येच्या आधारावर ही योजना राबविण्यात आली. कालांतराने लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ही योजना अपुरी पडू लागली. ४५ वर्षानंतर आजही ह्याच योजनेवर अवलंबून रहावे लागत असल्याने दरवर्षी पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. हि जीर्ण झालेली योजनेत अनेक बिघाड नेहमी होत असतात. सदरची योजना ही गिरणा नदीला सोडलेल्या आवर्तनावर अवलंबून असल्याने नदीला आवर्तन सोडलेले नसते. त्यावेळी योजना उन्हाळ्यात बंद असते. यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात देवळा शहरासह, सरस्वतीवाडी, माळवाडी, फुले माळवाडी, खुंटेवाडी, विजयनगर, आदी गावांना पाणींटचाईला तोंड द्यावे लागते. गत १५ दिवसांपासून गिरणा नदीला पाणी नसल्याने देवळा शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. यामुळे शहरातील अनेक भागात पुरेसे पाणी येत नव्हते. योजना पूर्णपणे बंद झाल्याने पाणीटंचाईच्या झळा आता मोठ्या प्रमाणात बसणार आहेत. गिरणा नदीला शनिवार दि. ३१ रोजी आवर्तन सोडण्यात आल्याने नागरीकांना दिलासा मिळाला होता. पुरेशा दाबाने आता पाणी मिळेल ह्या अपेक्षेत नागरीक असतांनाच शनिवारी सकाळी १० वाजता पाणी पुरवठा योजनेवरील सरस्वतीवाडी येथील मुख्य जलकुंभाचा दक्षिण बाजूकडील स्लॅब कोसळून जलकुंभात पडल्याने योजना बंद पडली.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत देवळा शहरासाठी अंदाजे साडेचार कोटी रुपये किंमतीची योजनेचे काम ६५ टक्के पूर्ण झाले असून जिल्हा परिषदेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने १५ मार्च २०१५ पर्यंत योजना पूर्ण करण्याचे उद्दीष्ठ ठेवले आहे.