वाहन उद्योग क्षेत्रावर मंदीचे सावट

By संजय पाठक | Published: March 22, 2019 01:37 AM2019-03-22T01:37:08+5:302019-03-22T01:38:32+5:30

गेल्या दोन महिन्यांपासून वाहन उद्योग संकटात सापडला असून, कामगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. अजून काही दिवस या आर्थिक मंदीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. मोठ्या उद्योगांवर आलेल्या या संकटाचा परिणाम लघु उद्योगांवर आणि तेथे काम करणाऱ्या कामगारांवर थेट होत आहे.

Due to the slow down in the auto industry sector | वाहन उद्योग क्षेत्रावर मंदीचे सावट

वाहन उद्योग क्षेत्रावर मंदीचे सावट

googlenewsNext
ठळक मुद्देबॉशमध्ये ‘ले आॅफ’ : अनेक कंपन्यांनी उत्पादन घटविले

नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून वाहन उद्योग संकटात सापडला असून, कामगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. अजून काही दिवस या आर्थिक मंदीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. मोठ्या उद्योगांवर आलेल्या या संकटाचा परिणाम लघु उद्योगांवर आणि तेथे काम करणाऱ्या कामगारांवर थेट होत आहे. आॅटोमोबाइल हब असलेल्या नाशिकमधील वाहनपूरक उद्योग अडचणीत आले असून, बॉश कंपनीतील काही कामगारांना ले आॅफ (पगारी सुटी) देण्यात येणार आहे, तर अन्य काही उद्योगांमध्ये इन आउट (फक्तयेण्या-जाण्याची नोंद करून घरी जाणे) ची कार्यवाही होत असल्याचे वृत्त आहे.
केंद्रीय औद्योगिक धोरणात उद्योगांसाठी कोणतेही आश्वस्त नसल्याने आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी या कारणांमुळे वाहन उद्योगासह अन्य उद्योगांवर आर्थिक मंदीचे सावट कोसळले आहे, असे औद्योगिक क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम गेल्या दोन तीन महिन्यांपासून प्रखरतेने जाणवायला सुरु वात झाली आहे. वाहनांची मागणी अचानक घटल्याने वाहन उत्पादनावर परिणाम झाला आहे. वाहन उद्योगांवर अवलंबून असलेल्या लहान मोठ्या उद्योगांना त्याचा फटका बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अग्रेसर असलेल्या ‘मारु ती सुझुकी’ या वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीने सुमारे ३० टक्के उत्पादन बंद केल्याने नाशिकमधील बहुराष्ट्रीय बॉश कारखान्यालाही या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे, असे समजते. कंपनीने कामगारांना पुढील आठवड्यात ले आॅफ देण्याची तयारी केली आहे, अधिकृत सूत्रांनी त्यास दुजोरा दिला असून, पुढील आठवड्यात सोमवार ते शनिवार पगारी सुटी देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
ग्राहकांकडून वाहन खरेदी कमी होत असल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम झाला असून, त्यामुळेच अशाप्रकारे ले आॅफ दिल्याचे सूत्रांनी सांगितले. बॉश कंपनीवर अवलंबून असलेल्या शेकडो लघु उद्योगांना (वेंडर्स) आणि तेथे काम करणाºया हजारो कामगारांवरदेखील बेरोजगारीची वेळ आली आहे. बॉशसह अशा अनेक कारखान्यांना आर्थिक मंदीला सामोरे जावे लागत आहे.
इलेक्ट्रॉनिक कारचा उद्योगावर परिणाम
प्रदूषणमुक्त धोरणाचा अवलंब केला जात असल्याने राष्ट्रीय पातळीवर ‘बीएस ६’ ही प्रणाली वाहन उद्योगांना बंधनकारक केली जात आहे. डिझेलवर चालणारी वाहने २०३० पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने वाहन उद्योगांनी इलेक्ट्रिककार उत्पादन करण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे वाहन उद्योग आणि त्यावर अवलंबून असलेल्या उद्योगांनाही आपल्या उत्पादनात बदल करणे अनिवार्य ठरणार आहे. लवकरच इलेक्ट्रिक कार बाजारात येणार असल्याने नवीन कार घेऊ इच्छिणाºया ग्राहकांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याचाही परिणाम वाहनांच्या मागणीवर होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Web Title: Due to the slow down in the auto industry sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.