शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या उन्हामुळे विल्होळीला बंधारा कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:59 IST

वाढत्या उन्हामुळे व पाण्याच्या अतिवापरामुळे यंदा प्रथमच गावाला पाणीपुरवठा करणारा विल्होळी बंधारा आटला असून, पंधरा दिवसांत पाऊस न आल्यास विल्होळीकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.

विल्होळी : वाढत्या उन्हामुळे व पाण्याच्या अतिवापरामुळे यंदा प्रथमच गावाला पाणीपुरवठा करणारा विल्होळी बंधारा आटला असून, पंधरा दिवसांत पाऊस न आल्यास विल्होळीकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. विल्होळी व परिसरात पाणीपुरवठा करणारे विल्होळी बंधाऱ्यातील पाणी झपाट्याने कमी होऊ लागल्याने ग्रामपंचायतीस आठवड्यातून दोन दिवस पाणी कपातीची वेळ आली असून, बंधाºयावर बसविण्यात आलेले कृषिपंप तत्काळ काढून घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.विल्होळी व परिसराला पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठी पाणीपुरवठा करणाºया विल्होळी बंधाºयाची पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली असून, उष्णतेचे वाढलेले तापमान व त्यातच या बंधाºयातून वारेमाप होणारा उपसा पाहता, आगामी पंधरा दिवसांपुरताच पाणी साठा पुरण्याची चिन्हे आहेत.या बंधाºयातून शेतीसाठीदेखील मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जातो. त्यामुळे हा उपसा असाच सुरू राहिल्यास बंधारा कोरडाठाक पडेल. त्याला पर्याय म्हणून पाणीपुरवठ्याची कोणतीही सोय वा व्यवस्था नसून तसे झाल्यास विल्होळीकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे या बंधाºयातून पाणी घेणाºया शेतकऱ्यांनी आपले कृषिपंप ताबडतोब काढून घ्यावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. त्याला काही शेतकºयांनी तत्काळ प्रतिसादही दिला असून, अनेकांनी ते काढण्याची कार्यवाही सुरू केली आहे.शेतक-यांची चारा छावणीची मागणीसध्याच्या वाढत्या उन्हामुळे जनावरांना मुबलक चारा, पाणी मिळत नसल्याने दररोज १२ ते १५ लिटर दूध देणारी जनावरे पाच ते सहा लिटरवर आल्याने दुधाच्या भावामध्ये वाढ झाली आहे. काही जनावरे धरणांमध्ये पाणी मिळत नसल्याने धोका पत्करून दलदलीसारख्या भागात उतरून पाण्याचा शोध घेत असल्याचे चित्र आहे. विल्होळी व परिसर हा नाशिक शहराच्या लगत असल्याने या ठिकाणी दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. उन्हाच्या दाहकतेने परिसरात चाºयाची कमतरता भासत असल्यामुळे शेतकºयांनी चारा छावणीची मागणी केली आहे.विल्होळी बंधाºयातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीपुरवठा करणाºया विहिरीस पाणी येत नाही. नाइलाजास्तव दिवसाआड पाणी सोडावे लागते, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा गैरवापर न करता पाणी जपून वापरावे. बंधाºयावर लावलेले कृषिपंप काढून घ्यावे, अन्यथा ग्रामपंचायतीच्या वतीने सदर कृषिपंप जप्त केले जातील.- बाजीराव गायकवाड, सरपंच

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीDamधरण