शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पावसाळापूर्व नालासफाई न केल्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 6:42 PM

येवला : यंदा पावसाळा वेळेवर व चांगला सुरु झाला असून गेल्या चार दिवसापासून येवला शहरात दररोज पाऊस पडत आहे. त्यामुळे येवला शहरातील मोठे मोठे नाले पालिकेची पावसाळापूर्व नाला सफाई झाली नसल्याने नाला व गटारी तुडुंब भरून वाहत आहेत. या गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी सुटली आहे. तसेच गटारी व नाल्यामधील कचरा व प्लास्टिक रस्त्यावर येत असल्याने शहरात कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात मोठे दोन नाले यासह कधीही प्रवाहित न झालेल्या मोठ्या गटारी आहेत.

ठळक मुद्देयेवला पालिकेने दुर्लक्ष्य : सर्वत्र दुर्गंधी सुटली; शहरवासीयांची स्वच्छतेची मागणी

येवला : यंदा पावसाळा वेळेवर व चांगला सुरु झाला असून गेल्या चार दिवसापासून येवला शहरात दररोज पाऊस पडत आहे. त्यामुळे येवला शहरातील मोठे मोठे नाले पालिकेची पावसाळापूर्व नाला सफाई झाली नसल्याने नाला व गटारी तुडुंब भरून वाहत आहेत. या गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी सुटली आहे. तसेच गटारी व नाल्यामधील कचरा व प्लास्टिक रस्त्यावर येत असल्याने शहरात कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात मोठे दोन नाले यासह कधीही प्रवाहित न झालेल्या मोठ्या गटारी आहेत.थेट शनीपटांगण भागातून येणारा मोठा नाला, आणि हुडको वसाहतीजवळचा नाला, यासह कधीही न वाहिलेल्या मोठ्या गटारी, यांची सफाई होण्याची गरज आहे. केवळ दोन नाले आणि चार गटारी स्वच्छ करून शहरवासियांचे समाधान होणार नाही. शहरात अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. संपूर्ण गावातील छोट्या मोठ्या गटारी पुन्हा एकदा स्वच्छ व्हावे अशी नागरिकांची अपेक्षा आहेच.स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राजकारण करणाºया नगरसेवकांनी ही मोहीम आपआपल्या प्रभागात राबवण्यास सक्र ीय सहभाग घ्यावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे. स्वच्छता मोहीम अनेकदा राबवली जाते. पुन्हा घाणीचे साम्राज्य पसरते. स्वच्छता मोहीम ही व्यापक जनचळवळ व्हावी अशी अपेक्षा आहे.येवला शहरातील शनिमंदिराजवळील नाला, हुडको परिसरात असणारा नाला, यासह काही छोटेमोठे नाले सध्या गाळाने व प्लास्टिकच्या कचर्याने भरले आहेत. शहरातील अनेक भागात अस्वछतेने कळस गाठला आहे. चौक तेथे घाण अशी अवस्था आहे. नाल्यासह गटारीतून कचरा आण िप्लास्टिक साचल्याने पाणी तुंबून राहते. पाणी साठते व परिसरात मोठी दुर्गंधी येत आहे. शिवाय परिसरातील रिहवाशी केरकचरा आणून टाकत असल्याने या कचर्याची प्रचंड दुर्गंधी पसरते.घाणीचे साम्राज्य पसरलेल्या मार्गावरून ये-जा करणाºयाना नाक दाबूनच मार्गक्र मण करावे लागते. यामुळे परिसरात संतापाची भावना तीव्र झाली आहे. परिसरातील नागरीक या घाणीमुळे त्रस्त झाले आहेत. पालिका या बाबत आता तरी लक्ष घालील काय ? असा सवाल येथील नागरिक करीत आहे.गंगादरवाजा भागासह फत्तेबुरुज नाका परिसरातील सर्व गटारी फुटलेल्या आहेत. कमालीची घाण साचली आहे. त्यामुळे पाऊस पडला कि या भागातील गटारी तुडुंब भरून वाहतात व भरलेल्या गटारीचे पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. फत्तेबुरु ज नाका कॉर्नरला तर कमालीची दुर्गंधी पसरली आहे.शहरातील नामांकित एन्झोकेम विद्यालय व स्वामी मुक्तानंदविद्यालय व महाविद्यालय, याच परिसरात आहे. गंगादरवाजा आणि हुडको रस्त्यावरून १७ जून पासून मोठी वर्दळ सुरु होईल. सर्वांना नाक बंद करूनच या परिसरातून जावे लागते. नगरपालिकेने या भागातही स्वच्छता अभियानाचा झाडू पुन्हा एकदा फिरवावा अशी मागणी परिसरातील नागरिकाकडून नेहमीच होत असते. अनेक ठिकाणी घाणीचे खच उघड्यावर टाकण्यापेक्षा नगरपालिकेने एकही कचरा कुंडीची व्यवस्था करावी.तसेच शहरातील रस्त्याची दुरवस्था झाली असून पावसामुळे रस्त्यावरून जात असताना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे नाला सफाईसह शहरातील स्वच्छता रस्त्याचे खड्डे असे अनेक विषय डोके वर काढत असून नगरपालिकेने तत्काळ कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याची चर्चा शहरात आहे. कॉलनी भागात रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. आता पाऊस पडल्यावर कसरत करीत घरात जावे लागते. सगळीकडे चिखल होण्याचा अनुभव नित्याचा आहे. शहरातील राणाप्रताप खुंटासह काहीभागात झालेले निकृष्ठ दर्जाचे रस्ते उखडले आहेत.शिवाय म्हसोबानगर सह कॉलनी भागातील सांडपाणी अंगणगाव लगत असणाºया नदीपात्रालगत सोडले गेल्याने प्रवाहित नसणाºया या नाल्यातून मोठी दुर्गधी येथे या परिसरातून नाक बंद करून जावे लागते. समस्येवर उपाययोजनेची गरज गरज आहे. येवला-विंचूर चौफुलीवर ट्राफिक जाम होण्याचा नित्याचा अनुभव आहे.येथे ट्राफिक सिग्नलची अनेक दिवसांची मागणी आहे. परंतु पूर्णत्वास जात नाही. त्यामुळे कॉलनीवासियांना जीव मुठीत धरून येथून प्रवास करावा लागत आहे.