शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
2
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
3
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
4
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
5
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
6
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
7
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
8
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
9
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
10
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
11
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
12
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
13
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
14
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
15
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
16
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
17
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
18
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
19
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
20
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने पिकांना संजीवनी

By admin | Updated: August 1, 2014 01:13 IST

पावसाने पिकांना संजीवनी

सिन्नर : तालुक्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील भाजीपालावर्गीय पिकांना संजीवनी मिळाली आहे. मात्र उशिराच्या पावसाने केवळ बाजरी व सोयाबीन या पिकांच्याच पेरणीवर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. तालुक्यात यंदा खरीप हंगामाचे ६४ हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. तथापि, १५ जुलैपर्यंत पेरण्या झाल्या असत्या तर उद्दिष्टापर्यंत पोहोचने शक्य झाले असते. तथापि, पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने खरीप हंगामाचे नियोजन कोलमडले आहे. तालुक्यात रोहिणी, मृग, आर्द्रा ही पावसाची व महत्त्वाची नक्षत्रे ठणठणीत कोरडी गेल्याने खरीप हंगामातील पेरण्या वेळेवर होऊ शकल्या नाहीत. सध्या सुरू असलेला रिमझिम पाऊस तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात अधिक आहे. अद्यापही पूर्व भागातील अनेक गावांना पावसाची प्रतीक्षा आहे. पेरण्या खोळंबल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्याने घाई करीत पेरण्यांवर भर दिला आहे. पूर्व भागात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने ग्रामस्थांची तहान केवळ शासनाच्या टँकरवर भागवावी लागते आहे. तालुक्यात ३०० टँकर सुरू आहेत. त्यातील सर्वाधिक टँकरची संख्या पूर्व भागातच आहे. त्यामुळे पूर्व भागातील ग्रामस्थांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. पश्चिम पट्ट्यातील अकोले तालुक्यातील पाचपट्टा भागातील विश्रामगड परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने म्हाळुंगी नदीला पाणी आले आहे. तालुक्यातील एकमेव नदीच प्रवाहित होऊ शकली आहे. अद्याप दुसऱ्या एकाही नदीला पाणी आले नाही. अनेक शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर विविध पिकांची रोपे टाकली होती. त्यांची लागवड करण्यासाठी सध्या लगबग सुरू आहे. या पावसाचा फायदा केवळ भाजीपालावर्गीय पिकांनाच होऊ शकला आहे. (वार्ताहर)