शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांअभावी खेडगाव येथे मृतदेह पाच तास पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:59 IST

लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा अडकल्याने अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह तब्बल पाच तास रस्त्यावर पडून राहिल्याची संतापजनक घटना घडली.

खेडगाव/वणी : लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा अडकल्याने अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह तब्बल पाच तास रस्त्यावर पडून राहिल्याची संतापजनक घटना घडली.शुक्र वार दिनांक २६ रोजी दुपारी खेडगाव वडनेर रस्त्यावरील आवारे वस्तीजवळ एका पादचाऱ्याला खेडगाव कडून वडाळीभोई कडे जाणाºया ट्रकने चिरडले. या अपघातात तो जागीच गतप्राण झाला. ही घटना तेथील शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनला कळविली तसेच पळून जाणाºया ट्रक चालकास ट्रकसह पकडून ठेवले. खेडगाव येथील दोन कर्मचारी सिन्नर येथे बंदोबस्तासाठी गेले होते तर पोलीस हवालदार खताळ यांना वणी पोलीस स्टेशनला ड्युटी असल्यामुळे पंचनामा करायला पोलीस यंत्रणा उपलब्ध न झाल्याने तब्बल पाच तास मृतदेह रस्त्यावरच पडून होता. पाच वाजेच्या सुमारास हवालदार खताळ हे घटनास्थळी पोहोचले व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी आरोग्य केंद्रात पाठविला. मृताच्या खिशात असलेल्या आधारकार्डावरून सदर गृहस्थ जळगाव जिल्ह्यातील असून त्याचे नाव भीमा रामा वंजारी आहे. त्यांचे वय सुमारे ६५ वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी चालकासह तो ट्रक पोलीस स्टेशनला नेला.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यूElectionनिवडणूक