पाइपलाइन फुटल्याने पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:28 IST2018-02-17T00:27:44+5:302018-02-17T00:28:04+5:30

पाइपलाइन फुटल्याने पाणीपुरवठा बंद
ओझर : विमानतळाला जोडणाºया रस्त्याचे काम सुरू असताना दुपारी ६०० मी.मी. व्यासाची पीएससी पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. तब्बल दोन तास पाण्याची नासाडी सुरू होती. त्यामुळे ओझर गावाचा पाणीपुरवठा शनिवारपर्यंत (दि. १७) खंडित राहील, अशी माहिती ग्रामपंचायतकडून देण्यात आली आहे. पालखेड धरणापासून येणारी मुख्य पाइपलाइन फुटली असून, लिकेजचे काम सुरू असल्याने ओझरला होणारा पाणीपुरवठा अनियमित झाला आहे. येत्या दोन दिवसात हा पाणीपुरवठा नियमित होणार असल्याची माहिती उपसरपंच सागर शेजवळ यांनी दिली.