महावितरणच्या त्रुटींमुळेच शहरात अंधार पालिकेत बैठक: वीजपुरवठ्यासाठी मदत; समन्वय समिती स्थापन

By Admin | Updated: May 30, 2014 01:05 IST2014-05-29T23:32:46+5:302014-05-30T01:05:55+5:30

नाशिक : शहरात दोन दिवस झालेल्या पावसामुळे वीजपुरवठ्यात बिघाड होऊन निम्मे शहर अंधाराच्या खाईत लोटले गेले. महावितरणकडून पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण न झाल्यानेच या समस्येला सामोरे जावे लागल्याचे गुरुवारी महापौर यतिन वाघ आणि आमदार वसंत गिते यांनी बोलावलेल्या बैठकीत स्पष्ट झाले. त्यामुळे शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेने महावितरणला मदत देण्याची तयारी दर्शविली आहे, तसेच उभयतांमध्ये समन्वय व्हावा यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Due to the mistakes of MSED, meeting in the city of Darka: Help for electricity supply; Set up coordination committee | महावितरणच्या त्रुटींमुळेच शहरात अंधार पालिकेत बैठक: वीजपुरवठ्यासाठी मदत; समन्वय समिती स्थापन

महावितरणच्या त्रुटींमुळेच शहरात अंधार पालिकेत बैठक: वीजपुरवठ्यासाठी मदत; समन्वय समिती स्थापन

नाशिक : शहरात दोन दिवस झालेल्या पावसामुळे वीजपुरवठ्यात बिघाड होऊन निम्मे शहर अंधाराच्या खाईत लोटले गेले. महावितरणकडून पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण न झाल्यानेच या समस्येला सामोरे जावे लागल्याचे गुरुवारी महापौर यतिन वाघ आणि आमदार वसंत गिते यांनी बोलावलेल्या बैठकीत स्पष्ट झाले. त्यामुळे शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेने महावितरणला मदत देण्याची तयारी दर्शविली आहे, तसेच उभयतांमध्ये समन्वय व्हावा यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरात मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस वादळी वार्‍यामुळे झाडे उन्मळून पडली, तसेच अन्य काही अडचणींमुळे वीजपुरवठा खंडित झाला. या पार्श्वभूमीवर महापौर ॲड. यतिन वाघ आणि आमदार वसंत गिते यांनी रामायण येथे महावितरणचे अधिकारी तसेच महापालिकेच्या विद्युत आणि उद्यान विभागाच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक बोलावली होती. महावितरणच्या वतीने दरवेळी पावसाळापूर्व कामे केली जातात. विशेषत: वीजतारांवर पडतील अशी झाडे आणि फांद्या हटविण्यात येतात; परंतु हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सातपूर आणि पंचवटी भागात मोठ्या प्रमाणात झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांनी सांगितले. झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी महावितरणकडे उंच शिडी (हायड्रोलिक लॅडर) नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर पालिकेच्या वतीने अशा प्रकारे शिडी उपलब्ध करून देण्याची तयारी महापौरांनी दर्शविली. रस्ता रुंदीकरणात बाधित होणार्‍या रोहित्रांचे स्थलांतर आणि वीजतारा भूमिगत करणे या कामासाठी पुरेसा निधी नसल्याने महापालिकेने आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली. तथापि, महापालिका केवळ संभाजी चौक, संुदरनारायण मंदिर यांसारख्या ठिकाणी रोहित्र स्थलांतरित करण्याचे काम करेल, असे महापौरांनी स्पष्ट केले.
वीजतारा भूमिगत करणे किंवा रस्त्याखाली क्रॉसिंग करणे यांसारखी कामे वेळेत व्हावी, रस्ता डांबरीकरण झाल्यानंतर पुन्हा खोदकाम होऊ नये यासाठी पालिकेचा बांधकाम, उद्यान आणि विद्युत विभाग तसेच महावितरण यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून, ४ जून रोजी त्यासंदर्भात बैठक होणार असल्याचे महापौर ॲड. यतिन वाघ यांनी सांगितले. बैठकीस पालिकेच्या विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता वसंत लाडे, कार्यकारी अभियंता शरद बनकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता विभाग-१ चे आर. एल. सोनुले, विभाग-२ चे डी. टी. सायनेकर आदि उपस्थित होते.

Web Title: Due to the mistakes of MSED, meeting in the city of Darka: Help for electricity supply; Set up coordination committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.