लग्नसराईमुळे नाशिकच्या चौफुलींवर वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 13:10 IST2018-05-03T13:10:35+5:302018-05-03T13:10:35+5:30

वाहन कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांचीदेखील दमछाक

 Due to marriage, traffic congestion on Nashik's four-wheeler | लग्नसराईमुळे नाशिकच्या चौफुलींवर वाहतूक कोंडी

लग्नसराईमुळे नाशिकच्या चौफुलींवर वाहतूक कोंडी

ठळक मुद्दे वाहन कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांचीदेखील दमछाक

नाशिक/ आडगाव : मुंबई महामार्गावरील जत्रा चौफुली, रासबिहारी आणि अमृतधाम चौफुली येथे वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली असली तरी दाट लग्नतिथीमुळे चारही बाजूंनी येणाऱ्या-जाणाºया वाहनांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहन कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांचीदेखील दमछाक होत असून, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी फेरनियोजन करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांसह वाहनचालकांनी केली आहे.
जत्रा हॉटेल, रासबिहारी आणि अमृतधाम चौफुली येथून औरंगाबाद रोडकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग आहे. या चौफुली तसेच औरंगाबाद रोडवर मोठ्या प्रमाणात लॉन्स असल्यामुळे चारी बाजूंनी येणाºया वाहनांमुळे कोंडी होते. लग्नाची तिथी दाट असल्यामुळे एकाच वेळी निघणाºया पाहुणे मंडळीच्या वाहनांमुळे वारंवार मोठी वाहतूक कोंडी होते. वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.
विशेष म्हणजे चौफुलीवरील सर्व्हिस रोडदेखील या काळात बंद असतात. त्यामुळे वाहनचालकांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे पर्यायी मार्गदेखील बंद होतात. शिवाय बेशिस्त वाहनचालकांमुळे देखील मोठी गैरसोय होते. त्यामुळे बºयाचदा वाद व शाब्दिक चकमकीच्या घटना पहावयास मिळतात.

Web Title:  Due to marriage, traffic congestion on Nashik's four-wheeler