सनदी लेखापालांच्या अधिकारांवरील मर्यादामुळे घडतात बँकीग क्षेत्रात घोटाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 14:28 IST2018-03-17T14:28:46+5:302018-03-17T14:28:46+5:30
सनदी लेखापाल हे केवळ लेखानोंद पुस्तकांची पडताळी करून त्यातील त्रूटी व उणीवा संबधित अस्थापनांच्या लक्षात आणून देत असतात. परंतु त्यांना यातील त्रूटी व चुंकांची चौकशी करण्याचे कोणतेही अधिकार नसल्याने पीएनबी बँके सारखे घोटाळे होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सनदी लेखापाल तथा इंन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल छाजेड यांनी केले.

सनदी लेखापालांच्या अधिकारांवरील मर्यादामुळे घडतात बँकीग क्षेत्रात घोटाळे
नाशिक : सनदी लेखापाल हे केवळ लेखानोंद पुस्तकांची पडताळी करून त्यातील त्रूटी व उणीवा संबधित अस्थापनांच्या लक्षात आणून देत असतात. परंतु त्यांना यातील त्रूटी व चुंकांची चौकशी करण्याचे कोणतेही अधिकार नसल्याने पीएनबी बँके सारखे घोटाळे होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सनदी लेखापाल तथा इंन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल छाजेड यांनी केले.
इंन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेत बँकीग ऑडिट विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेतील चर्चासत्रत मार्गदर्शन करण्यासाठी छाजेड नाशिक येथे आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सीए प्रफुल्ल छाजेड म्हणाले, सनदी लेखापाल हे परीक्षणाचे नव्हे, तर लेखानोंदीच्या पडताळणीचे काम करतात. त्यामुळे अस्थापनांनी उपलब्ध करून दिलेल्या दस्तऐवजांचे ताळेबंद व लेखा अहवालांसोबतचे पुरावे सनदी लेखापाल ग्राह्य धरून लेखापरीक्षण करीत असतात. त्यामुळे अनेकदा अस्थानांमधील अंतर्गत कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी नियोजनपूर्व भ्रष्टाचाल सनदी लेखापालाच्या नजरेतून राहून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकरणात सनदी लेखापाल नव्हे, तर संबंधित अस्थापानांचे अंतर्गत लेखाअधिकारीच जाबाबदार असल्याचे स्पष्ट केले. छाजेड यांनी या वक्तव्याच्या माध्यमातून पीएनबी घोटाळ्य़ात संबधित बँकेचेच लेखा अधिकारी गुंतलेले असण्याच्या शक्यतेकडे अंगुलीनिर्देश करीत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पीएनबी प्रकरणात लेखापालांकडे केलेला रोख चूकीचा असल्याचे संकेत दिले आहे. दरम्यान, जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीत सरकारने धाडसी निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाच्या दिशेने विकासाची प्रेरणा दिली असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी इन्स्टीटय़ूटचे माजी उपाध्यक्ष तथा प्रादेशिक अध्यक्ष सीए मंगेश किनारे, प्रादेशिक सदस्य विक्रांत कुलकर्णी, नाशिक शाखेचे अध्यक्ष मिलन लुणावत आदि उपस्थित होते.