शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोतील देवराई प्रकल्पाला घरघर ; पाण्याअभावी झाडांची रोपे वाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 18:57 IST

महापालिकेच्यावतीने देवराई प्रकल्पांतर्गत सिडको भागातील कर्मयोगीनगर भागात गेल्या वर्षभरापूर्वी वृक्षारोपण केले होते. परंतु आज मीतिला या देवराई प्रकल्पाच्या परिसरात संपूर्ण कचऱ्याचे ढीग साचलले असून पाणीपुरवठ्याची सोय नसल्याने अनेक झाडांना फटका बसला आहे.

ठळक मुद्देसिडकोतील देवराई प्रकल्पाची दुरावस्था मनपा उदयान विभागाची उदासीनता

नाशिक :  पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी महापालिकेच्यावतीने सिनेअभिनेते सयाजीराव शिंदे यांच्या हस्ते देवराई प्रकल्पांतर्गत येथील सिडको भागातील कर्मयोगीनगर भागात गेल्या वर्षभरापूर्वी वृक्षारोपण केले होते. परंतु आज मीतिला या देवराई प्रकल्पाच्या परिसरात संपूर्ण कचऱ्याचे ढीग साचलले असून पाणीपुरवठ्यायी सोय  नसल्याने अनेक झाडांना फटका बसला आहे. येथील अनेक झाडे पाण्याअभावी वाळून गेली असून याबाबत प्रभाग नगरसेवकांनी  उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊनही दखल घेतली जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. सिडकोतील प्रभाग क्रमांक २४ मध्ये गेल्यावर्षी सयाजीराव शिंदे यांच्या हस्ते देवराई प्रकल्पांतर्गत कर्मयोगीनगर भागातील महापालिकेच्या उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेने याठिकाणी पाणीपुरवठा व साफसफाईसाठी कोणतीही उपाय योजना केलेली नाही.  संबधित अधिकारी शिवाजी आमले यांना वारंवार पाणीपुरवठा सुरळीत करण्याची गरज निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांनी यांसदर्भात दखल घेतली नसल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक कल्पना पांडे यांनी केला आहे. महापालिकेने याठिकाणी पाणीपुरवठा पाईप लाईन टाकली असून पाण्याची टाकीही अनेक दिवसांपासून उद्यानात पडून आहे. परंतु केवळ पाणीपुरवठा पाईप लाईन कनेक्शन पाण्याच्या टाकीत जोडले नसल्याने  झाडांना पुरेसे पाणी मिळत नाही. दरम्यान,  महापालिकेच्या उद्यान विभागाच्या उदासिनतेमुळे या देवराई प्रकल्पाला घरघर लागली असून या भागातील  प्रवीण पाटील, शोभा ढोमसे, मंगल वराडे,अशोक सुराणा रवींद्र्र गीते,अनिल बोंबे, राजू चव्हाण,उषा गोसावी,रवींद्र कुलकर्णी,नितीन ठोके, जगन पाटील यांनीही महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेत या उद्यानात पाणीपुरवठा सोय करण्यासाठी मागणी केली होती. परंतु, महापालिका अधिकाऱ्यांनी याकडे लक्षच दिले नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. 

उद्यानाला बकाल स्वरुपदेवराई प्रकल्पाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण कचरा व पालापाचोळा जास्त झाला आहे. महापालिकेने  थाटामाटात देवराई प्रकल्प अंतर्गत उद्यानात वृक्षरोपण केले असले तरी या संपूर्ण उद्यानाला देखभाली अभावी बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. 

टॅग्स :environmentपर्यावरणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाsayaji shindeसयाजी शिंदेWaterपाणी