शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
3
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
4
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
5
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
6
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
7
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
8
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
9
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
10
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
11
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
12
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
13
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
14
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
15
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
16
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
17
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
18
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
19
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
20
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभाग नसल्याने गाळ उपसा रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 17:04 IST

सिन्नर : तालुक्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या भोजापूर धरणातून गाळ उपसा होण्यासाठी लोकसहभाग मिळत नसल्याने धरणातील गाळ वर्षानुवर्षे वाढत आहे. गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविण्याची गरज केवळ बोलघेवडी ठरत असून प्रत्यक्षात गाळ काढण्याची कामे सुरु होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातून उगम पावणाºया म्हाळूंगी नदीवर भोजापूर धरण बांधलेले आहे. सुमारे ३६५ दशलक्ष घनफूट पाण्याची क्षमता आहे. भोजापूर धरणावर परिसरातील शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. धरण परिसराठी वरदान ठरलेले आहे. धरणाची निर्मिती झाल्यापासून मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता तसेच टेकड्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत चालली होती. धरणातील गाळ काढण्याची अनेक वर्षांपासून मागणी होती. गेल्या वर्षी आमदार राजाभाऊ वाजे यांनी प्रस्ताव करून मेरी संस्थेमार्फत धरणातील गाळाचे सर्व्हेक्षण केले होते. त्या आहवालात धरणात १३ लाख ६७ हजार ४२८ घनमीटर गाळ साचला आहे म्हणजे १२ दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा कमी झाली होता. आमदार राजाभाऊ वाजे यांनी पुढाकार घेवून धरणातील गाळ काढण्यासाठी पाटबंधारे विभागामार्फत तयारी केली होती. पाटबंधारे विभागाने सुमारे ४० लाख ८६ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून त्यास कार्यकारी अभियत्यांनी त्यास तांत्रिक मान्यता दिली होती. त्यानतंर गेल्यावर्षी गाळमुक्त धरण व जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या तालुकास्तरावर बैठकीत आमदार वाजे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअभियंता यांनी त्यास प्रशासकीय मान्यता दिली. सदरचे काम युवा मित्र, टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून केले जाणार होते. सदर कामाचा कार्यरंभ आदेश निघाला होता. पहिल्या टप्प्यात धरणातून ३ लाख ६५ हजार ४७४ घनमीटर गाळाचा उपसा केला जाणार होता. गेल्यावर्षी धरणातील गाळ काढण्यासाठी युवा मित्र संस्थेने दोन पोकलेन व डंपर ही यंत्रसाम्रुगी धरणावर आणून ठेवली होती. गाळ उपसल्यानंतर शेतकºयांनी तो स्वखर्चाने आपल्या शेतात वाहून न्यायचा होता. मात्र गाळ वाहून नेण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने आठ दिवसानंतर यंत्रसामुग्री अन्यत्र हलविण्यात आली. त्यानंतर गाळ उपशाचे काम अद्याप सुरु झाले नाही. लोकसहभाग नसल्याने धरणातील गाळ उपसा रखडला आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी