खेरवाडी ते चितेगावफाटा रस्त्याची दुरवस्था

By Admin | Updated: August 12, 2014 01:27 IST2014-08-11T21:03:27+5:302014-08-12T01:27:58+5:30

खेरवाडी ते चितेगावफाटा रस्त्याची दुरवस्था

Due to Khedwadi to Chitgaon Phata Road | खेरवाडी ते चितेगावफाटा रस्त्याची दुरवस्था

खेरवाडी ते चितेगावफाटा रस्त्याची दुरवस्था


नाशिक : निफाड तालुक्यातील खेरवाडी ते चितेगावफाटा या सुमारे पाच किलोमीटर रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून हा रस्ता नादुरुस्त अवस्थेत आहे. या रस्त्यावर काही ठिकाणी गुडघ्या एवढे खड्डे पडले आहेत.
या रस्त्याच्या परिसरात सुमारे ४ ते पाच हजार लोकवस्ती आहे. येथून प्रवास करून अनेकांना कंबरदुखीचा त्रास झाला आहे. चितेगावपासून ते फाट्याकडे जात असताना भैरवनाथ मंदिराच्या मागील बाजूस हा रस्ता पूर्ण मातीत गेला आहे. गेल्या काही वर्षांपासून चितेगावातील नागरिकांना गावाला वळसा घालून फाट्याकडे जावे लागते. चितेगाव सोसायटीची भव्य इमारत उभी आहे; परंतु या इमारतीकडे जाण्यासाठी हाच रस्ता आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Due to Khedwadi to Chitgaon Phata Road