वाढत्या धुक्यामुळेआंबा पिक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 18:09 IST2019-01-31T18:08:42+5:302019-01-31T18:09:08+5:30

खेडलेझुंगे : अत्यल्प पाऊस, अप्रतिकूल हवामान, तीव्र दुष्काळ, गेल्या पंधरवाड्यात पडलेले दाट धुके यामुळे अद्याप आंब्याला मोहर फुटलेला नाही. जानेवारी महिन्याचा शवेटचा आठवडा सुरू झालेला असुनही मोहर न फुटल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे यंदाचे आंबापिक धशेक्यात असल्याचे शेतकरी बोलू लागले आहेत.

Due to increased fog, the risk of crop failure | वाढत्या धुक्यामुळेआंबा पिक धोक्यात

वाढत्या धुक्यामुळेआंबा पिक धोक्यात

ठळक मुद्देअत्यल्प पाऊस, अप्रतिकुल हवामान व तीव्र दुष्काळी परिस्थीती

खेडलेझुंगे : अत्यल्प पाऊस, अप्रतिकूल हवामान, तीव्र दुष्काळ, गेल्या पंधरवाड्यात पडलेले दाट धुके यामुळे अद्याप आंब्याला मोहर फुटलेला नाही. जानेवारी महिन्याचा शवेटचा आठवडा सुरू झालेला असुनही मोहर न फुटल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे यंदाचे आंबापिक धशेक्यात असल्याचे शेतकरी बोलू लागले आहेत.
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मोहर फुटण्यास सुरुवात होते. आता जानेवारी संपला तरीही जुन्या गावरान झाडांना मोहर आलेला नाही. आता मोहर येण्याची आशा धुसर होत चालली आहे. यावर्षीच्या वातावरणातील बदलाचा सर्वच पिकांवर परिणाम झाल्याचे दिसुन येत आहे.
सद्यस्थितीत आंबा हे एक सर्वत्र महत्वाचे पैसे मिळवून देणारे फळपीक झालेले आहे. उशिरा आलेल्या थंडीमुळे व धुक्यामुळे आंब्याची अनेक झाडे मोहरली नाहीत. काही झाडांना थोडाफार आलेला मोहर अतिथंडीमुळे करपून जात आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पूर्वी ग्रामीण भागात गावाच्या आजूबाजूला आमराई असायची त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आंब्याची किंमत वाटायची नाही. परंतु कालांतराने वृक्षतोड माफियाकडून या फळांच्या झाडाची कत्तल झाली त्यामुळे ही आमराई नामशेष झाली आहे. आता मोजक्याच शेतकऱ्यांकडे चार-दोन आंब्याची झाडे आहेत. त्यांना या वर्षी या झाडांना अजुनही मोहर फुटलेला दिसत नाही. ज्या झाडांना मोहोर आलेला आहे तोही अतिथंडीमुळे व जोराच्या वाºयामुळे गळुन पडत आहे. या वर्षी आंब्याला मोहर दिसत नसल्यामुळे शेतकरी चिंतीत झाला आहे.
गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात झाडांना मोहर दिसत होता, त्यामुळे उत्पन्न चांगले मिळेल अशी शेतकºयांना आशा वाटत होती. मात्र वातावरणातील बदलत्या परिणामामुळे गतवर्षी मोहर गळून गेला होता. त्याच प्रमाणे यंदा देखिल गेल्या पंधरवड्यात पडलेल्या दाट धुक्यामुळे आंब्याच्या मोहराला फटका बसला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या धुक्याच्या कहरामुळे व अतिथंडीमुळे सुद्धा आंब्याला याचा फटका बसत असल्याचे दिसत आहे. ढगाळ वातावरणामुळे आलेला तुरळक मोहर गाळून जात आहे. (फोटो ३१ आंबा)

Web Title: Due to increased fog, the risk of crop failure

टॅग्स :Mangoआंबा