शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 4:18 PM

सिन्नर : गेल्या काही दिवसांपासून सर्वच प्रकारच्या भाजपाल्याची आवक वाढल्याने बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. तर शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकºयांवर पुन्हा एकदा निराश होण्याची वेळ आली आहे.

सिन्नर : गेल्या काही दिवसांपासून सर्वच प्रकारच्या भाजपाल्याची आवक वाढल्याने बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. तर शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकºयांवर पुन्हा एकदा निराश होण्याची वेळ आली आहे. सिन्नरच्या भाजीबाजारात मेथी व कोथंबिरीची मातीमोल भावाने विक्री होत असल्याचे चित्र आहे.पहाटे येथील चौदा चौक वाडा शॉपिंग सेंटरच्या भाजीबाजारात घाऊक दराने भाजीपाल्याची विक्री होत असते. परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने भाजीपाला घेऊन येत असतात. गुरुवारी पहाटे मेथी, कोथंबिर, पालक, कोबी, फ्लॉवर यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने बाजारभाव घसरल्याचे चित्र होते. होलसेल भाजीबाजारात वांगी, काकडी, दोडके, शिमला मिरची, कोबी, वाटाणा, फ्लॉवर, मेथी, कोथंबिर या सारख्या पालेभाज्या मोठया प्रमाणात दाखल झाल्या होत्या. वांगी आवक वाढल्याने बाजारभाव घसरलेले आहे. वांगी ४ ते ५ रूपये प्रति किलो दराने विक्र ी होत आहे तर भोपळयाचे बाजारभाव घसरण झाली आहे. भोपळयाच्या प्रति नगाला ३ ते ४ रूपये तर कोबी व फ्लॉवरचे कंद ३ ते ५ रुपये दराने विक्री होत आहे. शिमला मिरची २० ते २५ रूपये, दोडके २५ ते ३० रूपये असा बाजारभाव किलोमागे शेतकºयांना मिळत आहे. सध्या हिवाळा असल्याने मोठया प्रमाणात फळभाज्यांची आवक वाढलेली आहे. याशिवाय मध्यप्रदेशातून वाटाणा मोठया प्रमाणात दाखल होत असल्याने ग्राहकांचा कल वाटाणा खरेदीकडे जास्त असल्याने अन्य फळभाज्यांच्या बाजारभावावर परिणाम झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक