शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

करवाढप्रश्नी निर्णय टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:40 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडांसह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनीचे करयोग्य मूल्य निश्चित करताना त्यात केलेल्या वाढीविरोधी येत्या सोमवारी (दि.२३) होणाऱ्या विशेष महासभेत चर्चा होऊन निर्णयाची प्रतीक्षा असतानाच विधानपरिषदेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने करवाढप्रश्नी कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यास ब्रेक बसला आहे.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडांसह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनीचे करयोग्य मूल्य निश्चित करताना त्यात केलेल्या वाढीविरोधी येत्या सोमवारी (दि.२३) होणाऱ्या विशेष महासभेत चर्चा होऊन निर्णयाची प्रतीक्षा असतानाच विधानपरिषदेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने करवाढप्रश्नी कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यास ब्रेक बसला आहे. जिल्हाधिकाºयांनी आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिल्याने महासभेत निर्णय न होता केवळ चर्चेचे गुºहाळ रंगणार आहे.  आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडांसह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनीचे करयोग्य मूल्य निश्चित करत ३ पैशांवरून २० पैसे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे तीव्र पडसाद शहरात उमटत आहेत. शहराला जोडण्यात आलेल्या गावांमधील शेतकरी त्याविरोधात संघटित होत असून व्यापारी, उद्योजकांसह राजकीय पक्षही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. सत्ताधारी भाजपातही आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात अस्वस्थता पसरलेली आहे. त्यातूनच भाजपाच्या तीनही आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सदर करवाढ तातडीने रद्द करण्याची मागणी केलेली आहे.  दरम्यान, सत्ताधारी भाजपाने येत्या सोमवारी (दि.२३) विशेष महासभा बोलावत त्यात सदर करवाढ रद्द करण्यासंबंधी प्रस्ताव चर्चेला आणण्याची रणनीती आखली होती. त्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांकडून प्रस्तावही महासभेवर दाखल करण्यात आलेले आहेत. विशेष महासभेत सदर करवाढ रद्दबातल करत तसा ठराव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय होण्याची शक्यता होती. परंतु, शुक्रवारी (दि.२०) नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे महासभेवर आचारसंहितेचे सावट निर्माण झाले. याबाबत महापालिकेच्या नगरसचिव विभागाने तातडीने जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांना पत्र लिहून महासभा घेण्याबाबत मार्गदर्शन मागविले. त्यानुसार, जिल्हाधिकाºयांनी महापालिकेला उत्तर पाठविले असून, महासभेत मतदारांवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडेल अशा घोषणा किंवा मतदारांना प्रलोभन मिळेल, अशा स्वरूपाचे निर्णय घेण्यास मनाई केली आहे. याशिवाय, आचारसंहितेचा भंग होणार नाही, याचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, महासभेत धोरणात्मक निर्णय घेण्यावर बंधन आले आहे. परिणामी, करवाढप्रश्नी केवळ चर्चा करता येणार असून, कोणताही ठराव अथवा निर्णय घेता येणार नाही. येत्या २९ मे पर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे. तोपर्यंत करवाढीप्रश्नी निर्णय टांगणीला लागणार आहे.आंदोलन होणार काय?अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने येत्या सोमवारी (दि.२३) राजीव गांधी भवन येथे करवाढविरोधी आंदोलन छेडण्याची तयारी सुरू आहे. त्यानुसार ठिकठिकाणी बैठका, मेळावा घेऊन जागृतीही केली जात आहे. सदर आंदोलनाला शिवसेना, कॉँग्रेससह अन्य सर्व पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, विधानपरिषदेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने सदर आंदोलनाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आचारसंहितेमुळे पोलिसांकडून सदर आंदोलनाला परवानगी नाकारली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.अधिकाºयांच्या शास्तीवरही प्रश्नचिन्हविशेष महासभेत प्रशासनाकडून निलंबित उद्यान अधीक्षक गो. बा. पाटील यांना बडतर्फ करण्याचा तसेच निवृत्त अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांच्या निवृत्ती वेतनातून दरमहा १० टक्के रक्कम कपात करण्याचा तर निवृत्त वैद्यकीय अधिकारी हिरामण कोकणी यांच्या निवृत्ती वेतनातून दरमहा १०० रुपये कपात करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र, आता आचारसंहितेमुळे या प्रस्तावावर निर्णय घेता येणार नसल्याचे सांगितले जात आहे. परिणामी, संबंधित अधिकाºयांच्या शास्तीवरही प्रश्नचिन्ह लटकले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका