शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

कसारा घाटात महामार्ग खचल्याने वाहतूक मंदावलीइ

By admin | Updated: August 1, 2014 01:12 IST

कसारा घाटात महामार्ग खचल्याने वाहतूक मंदावलीइ

गतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावर मुसळधार पावसाने दरड कोसळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच आज हाच रस्ता मुसळधार पावसाने खचल्याने महामार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प झाली. सुमारे पाच फूट खोल आणि तीन फूट रुंद असे त्याचे स्वरूप होते. दरम्यान, महामार्ग पोलिसांनी या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरु केल्यानंतर दुपारनंतर वाहतूक संथगतीने पूर्वपदावर आली.मुंबई आग्रा महामार्गावर गुरूवारी दुपारच्या सुमारास मुसळधार पावसामुळे नवीन महामार्गावर लतीफवाडीच्या अलीकडील वळणावर महामार्गाचा भराव पाण्याने वाहून गेला. त्यामुळे रस्ताही सुमारे पंचवीस फुट उभा खचला. हा रस्ता खचला गेल्याने मधोमध दुभंगला गेला. ही माहिती काही वाहनचालकांनी नजीकच्या महामार्ग पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरीकेटस लावून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. त्यानंतर वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठी या मार्गावरून संथगतीने एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली. दरम्यान, महामार्गावर अनेक ठिकाणी रस्ते खचण्याचे प्रकार घडले आहे. आता पावसाळ्यात रस्ता दुरु स्त करण्याचे मोठे आव्हान या निमित्त प्रशासनासमोर उभे राहिले आहे. (वार्ताहर)