फसव्या कर्जमाफीमुळेच आत्महत्या वाढल्या
By Admin | Updated: July 9, 2017 23:53 IST2017-07-09T23:28:40+5:302017-07-09T23:53:53+5:30
सटाणा : शेतकरी कर्जमाफीसाठी लावलेल्या अटी रद्द करून या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

फसव्या कर्जमाफीमुळेच आत्महत्या वाढल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी लावलेल्या अटी व शर्ती रद्द करून सरसकट कर्जमाफी देण्याबरोबरच कांद्याला हजार रुपये हमीभाव द्यावा, या मागणीसाठी बागलाण राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
कर्जमाफी योजनेत शेतकरी कुटुंब हा निकष लावण्यात आला आहे. कुटुंब शब्दाच्या व्याख्येत पती-पत्नी व अठरा वर्षांखालील मुलांचा समावेश आहे. शेतकरी पती व पत्नी या दोघांच्या नावाने स्वतंत्र कर्ज घेतले असल्यास त्या कुटुंबाला या कर्जमाफीचा फायदा मिळत नसल्यामुळे ही फसवी कर्जमाफी म्हणून शेतकरी आत्महत्येत वाढ होत असल्याचे दुर्दैवी चित्र बागलाणमध्ये बघायला मिळत असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे. याप्रसंगी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष रेखा शिंदे, पंचायत समिती सदस्य वसंतराव पवार, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, ज. ल. पाटील, जुनी शेमळीचे सरपंच अमोल बच्छाव, वंदना भामरे, किरण पाटील, अनिल चव्हाण, जे. डी. पवार, पांडुरंग सोनवणे, गणेश जाधव, पोपट चव्हाण, राजेंद्र सावकार, समीर देवरे, सचिन जाधव आदी उपस्थित होते. राज्य सरकारने जून २०१६ ऐवजी जून २०१७ च्या थकबाकीदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. सरकारने विविध तारखांचा गोंधळ घालून शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी वंचित ठेवल्याने शेतकरी हताश झाला आहे. अटी-शर्ती रद्द करून सरसकट कर्जमाफी द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.